Bigg Boss Season 18 : नुकताच बिग बॉस 17 (Big Boss Season 17) चा सीझन संपला. यामध्ये मुन्नवर फारुकीने (Munnawar Faruqui) ट्रॉफीवर मोहोर उमटवली. आता प्रेक्षकांना बिग बॉस सीझन 18 (Bigg Boss Season 18) ची उत्सुकता लागून राहिली आहे. नुकतीच बिग बॉस 18बाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. या शो मध्ये कोण स्पर्धक म्हणून जाणार याची उत्सुकता प्रत्येकाला असते. प्रत्येकजण आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना त्या घरात पाहण्यास इच्छुक असतात. अशातच बिग बॉस सीझन 18 च्या पहिल्या स्पर्धकाविषयी माहिती समोर आली आहे.
आत्तापर्यंत बिग बॉस सीझन 18 मध्ये एंट्री घेणाऱ्यांमध्ये अनेक नावांची चर्चा झाली आहे. दरम्यान या शोमध्ये जाणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव सध्या समोर आले आहे. एक सोशल मीडिया स्टार बिग बॉस सीझन 18चा पहिला स्पर्धक असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. डिजिटल कंटेंट क्रिएटर पूजा शर्मा रेखाने बिग बॉस 18 मध्ये जाण्यासाठी संपर्क साधला असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. पूजा ही ट्रान्सजेंडर आहे आणि तिचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.
कोण आहे पूजा शर्मा रेखा?
पूजा रेखा शर्मा मुंबईच्या लोकल ट्रेनमधील डान्समुळे खूप फेमस झाली. पूजा तिचा लूक अगदी रेखासारखा ठेवते. त्यामुळे लोक तिला रेखा या नावने ओळखतात. पूजा शर्मा ही ट्रान्सजेंडर असून तिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.पूजा जेव्हा लोकल ट्रेनने कोणत्याही ठिकाणी जाते तेव्हा ती शगुन म्हणून फक्त एक रुपया घेते.
मुंबईतील लोकांव्यतिरिक्त पूजा शर्मा रेखाचे अनेक स्टार्सही सोशल मीडियावर चाहते आहेत. बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्ससोबत पूजाचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. जेव्हा पूजाला बिग बॉस 18 मध्ये जाण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले की, 'वेळ आल्यावर सर्वांना माहिती मिळेल'. मात्र, अद्याप कोणाच्याही बाजूने याला दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पूजा रेखा शर्मा ही बिग बॉस 18 च्या घरात पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.