Marathi Celebrity On Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crisis) भूकंप झाला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या राजकीय घडामोडीवर नेटकऱ्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारदेखील भाष्य करत आहेत.
सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) इंस्टा स्टोरी पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चालंलय तरी काय?",असा प्रश्न तिने नेटकऱ्यांना विचारला आहे. उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) लिहिलं आहे,"मतदात्याच्या बोटाला शाही नाही आता चुनाच चुना". तसेच त्याने सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे.
स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) ट्वीट करत लिहिलं आहे,"उत्तम पटकथा लिहिण्याची कला". त्याच्या या पोस्टवर तुम्हाला संधी मिळाली तर नक्की यावर सिनेमा करा, आता तुम्ही एका राजकारणी व्यक्तीवर एक रोल करा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
हेमंत ढोमेने (Hemant Dhome) ट्वीट केलं आहे की,"खेळ तर आता सुरू झालाय". त्याच्या या पोस्टवर खेळ तर सर्वसामान्य जनतेचा झाला आहे, फडणवीस साहेबांना एकदा भेटा.. खूप चांगली पटकथा आहे वेबसीरिज होईल, हा न संपणारा खेळ आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मराठी मालिकांच्या लोकप्रिय लेखिका रोहिणी निनावे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"कुणी कुणाचं नसतं काका... कुणी कुणाचं नसतं.. कटसम्राट".
दिग्दर्शत जयंत पवार यांनी लिहिलं आहे,"आता फक्त तिघेच राहिले ते ही आले की मतदार अनंतात विलीन व्हायला मोकळे". तेजस्विनी पंडित, 'हाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे लेखक सचिन गोस्वामी, सलील कुलकर्णी, शरद पोंक्षे आणि मुग्धा गोडबोले यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय घडामोडींवर संतप्त पोस्ट केल्या आहेत. त्यांच्या या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, बाबूराव अत्राम, अनिल भाईदास पाटील यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
संबंधित बातम्या