Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्रात राजकीय नाट्य (Maharashtra Political Crisis) पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. 


मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) ट्वीट करत लिहिलं आहे,"भेळ हवीये भेळ? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल". तसेच राज ठाकरेंचं ट्वीट रीट्वीट करत तिने लिहिलं आहे,"तत्वनिष्ट सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अश्याच माणसानं आता महाराष्ट्रावर 'राज' करावं - महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक". 










'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लेखक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनीदेखील फेसबुक पोस्ट शेअर करत राजकीय भूकंपावर भाष्य केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,"महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट, भा ज पा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपातील काँग्रेस नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार... (मतदारांची ऐशी तैशी-नैतिकतेच्या आईचा घो...)".  त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवली आहे. 



सलील कुलकर्णीने गंमतीशीर पोस्ट केली आहे. त्याने लिहिलं आहे,"बाकी सगळं ठीक आहे पण रविवारी दुपारची झोपमोड झाली ना राव सगळ्यांची... अगदी 1 ते 4 मध्ये?". त्यांच्या या पोस्टवर गेल्यावेळी पहाटे.. आता दुपारी.. झोपेवर उठलेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर 'आई कुठे काय करते' या मालिकेची लेखिका मुग्धा गोडबोलेने लिहिलं आहे,"यांचं सगळं लक्ष इकडेच... महामार्ग वगैरे पडलं मागे".




शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी लिहिलं आहे,"तत्त्व, वैचारिक बैठक, नितीमत्ता हे शब्द आज वारले". 



अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या शपथविधीनंतर नव्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. अजित पवारांसह  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकंदरीतच अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra News: पहाटेचा शपथविधी अखेर साक्षात उतरला! महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार