Badshah Controversy Online App Case: गायक आणि रॅपर बादशाहला (Badshah) महाराष्ट्र सायबर सेलमं चौकशी बोलावले. फेअरप्ले नावाचे अॅप कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही आयपीएल दाखवत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे वाय कॉमच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबरने फेअर प्लेवर डिजिटल कॉपी रायटरचा गुन्हा दाखल केला. सूत्रांनी सांगितले की, बादशाहने फेअर प्लेची जाहिरात केली होती, त्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले.


नुकतेच ANI नं एक ट्वीट शेअर केलं आहे.  या ट्वीटमध्ये बादशाहचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे, "महाराष्ट्र  सायबर सेल पोलीस हे रॅपर बादशाहची ऑनलाइन बेटिंग कंपनी अॅप 'फेअरप्ले' संदर्भात मुंबईत चौकशी करत आहेत." बादशाह सोमवारी (30 ऑगस्ट) महाराष्ट्र सायबर कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला.


या प्रकरणी बॉलिवूडमधील 40 कलाकारांना समन्स बजावले जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही या  अॅपचा प्रचार केला असून त्यालाही समन्स बजावले जाऊ शकते. 






आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया हे बादशाहचं खरं नाव आहे. 2006 साली त्यानं संगीतक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. डीजे वाले बाबू, लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. बादशाह हा याआधी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बादशाहचं सनक हे गाणं रिलीज झालं. या गाण्यावर अनेक नेटकऱ्यांनी रिल्स केले. या गाण्यातील लिरिक्समुळे बादशाह हा वादाच्या भोवऱ्यात अडकला.  बादशाहनं त्याच्या या नव्या गाण्यात महादेवाच्या नावाचा वापर केला, ज्यामुळे महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी बादशाहला फटकारले होते. बादशाहचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी गाण्यांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. बादशाह हा त्याच्या आगामी गाण्यांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असतो.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Badshah: "बादशाह"नं जिंकली मनं! भर कार्यक्रमात 15 वर्षीय चाहतीला दिले 1.5 लाखांचे शूज, पाहा व्हिडीओ