Salman Khan and Cristiano Ronaldo: सौदी अरेबियामधील (Saudi Arabia) रियाध येथे टायसन फ्युरी आणि फ्रान्सिस नगानौ यांच्यात बॉक्सिंग सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी सलमान खाननं (Salman Khan) हजेरी लावली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) आणि कोनोर मॅकग्रेगर (Conor McGregor) यांनी देखील हा सामना पाहिला. सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग मॅचचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका फोटोमध्ये रोनाल्डो आणि सलमान एकाच फ्रेममध्ये दिसले.
सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग मॅचमधील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोनाल्डो हा सलमानला सोडून इतर प्रेक्षकांना भेटताना दिसत आहे. त्यामुळे रोनाल्डोनं सलमानला इग्नोर केलं का? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला आहे.
केआरके उर्फ कमाल आर खाननं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगप्रसिद्ध खेळाडू आहे आणि तो छोट्या-मोट्या कलाकारांना ओळखत नाही. रोनाल्डोनं सलमानला इग्नोर केलं, अशी चर्चा आता केआरकेनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर होत आहे.
पाहा व्हिडीओ:
रियाध येथे पार पडलेल्या बॉक्सिंग मॅचमधील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि सलमान खान हे मॅच बघताना दिसत आहे. हा फोटो शेअर करुन एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, दोन GOATS (Greatest of All Time) एकाच फ्रेममध्ये
सलमान खान हा 'टायगर 3' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट यंदा दिवाळीला 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात सलमानसोबतच इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: