Badshah: प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाह हा विविध कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करतो. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या YouTube फॅनफेस्टमध्ये देखील बादशाहनं परफॉर्म केलं. या दरम्यान बादशाह त्याच्या 15 वर्षांच्या चाहतीला 1.5 लाखांचे शूज गिफ्ट म्हणून दिले. बादशाहचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये दिसत आहे की, तो त्याच्या चाहतीला शूज देत आहे.
बादशाहने मोनिका बोहरा या 15 वर्षीय मुलीला व्हर्जिल अबलोहनं डिझाइन केलेले लुई व्हिटॉन ट्रेनर 2 शूज गिफ्ट म्हणून दिले, ज्याची किंमत जवळपास 1.50 लाख आहे. मोनिका बोहरानं तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन बादशाहचे आभार मानले आहेत. मोनिकाच्या वाढदिवसानिमित्त बादशाहने हे खास गिफ्ट तिला दिले.
मोनिका बोहरानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बादशाह हा कॉन्सर्टमध्ये त्याचे शूज काढतो आणि प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या मोनिकाला गिफ्ट म्हणून देतो. मोनिकानं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं मोनिकाच्या पोस्टला कमेंट केली, "तू लकी आहेस"
बादशाहने सोशल मीडियावर मोनिकाचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "प्यार कमाया है"
बादशाहचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी गाण्यांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया हे बादशाहचं खरं नाव आहे. 2006 साली त्यानं संगीतक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. डीजे वाले बाबू, लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
काही दिवसांपूर्वी बादशाह हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी (Isha Rikhi) यांच्या नात्याबाबात सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु होती.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: