Actor R Madhavan Meets Rajinikanth : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर रजनीकांतने (Rajinikanth) आता आर. माधवनची भेट घेतली आहे. 


रजनीकांतच्या भेटीचा व्हिडीओ आर.माधवनने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"दिग्गजांनी आपल्या कामाचं कौतुक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे". रजनीकांतने 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' या सिनेमासाठी आर. माधवनचं कौतुक केलं आहे. 






रजनीकांतने ट्वीट करत म्हटलं आहे, 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' हा सिनेमा प्रत्येकाने पाहावा. तरुणांनी पाहायला हवा असा हा सिनेमा आहे. माधवनने दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच प्रयत्नात वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच तो एक उत्तम दिग्दर्शकदेखील आहे. अशा वेगळ्या विषयावर सिनेमा केल्याबद्दल माधवनचे अभिनंदन". 


'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा 26 जुलैला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. सिनेमागृहात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. 


'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' सिनेमासाठी आर.माधवनने घेतली विशेष मेहनत


'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा आर माधवनचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमासाठी आर. माधवनने विशेष मेहनत घेतली आहे. 


संबंधित बातम्या


Rocketry OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आर. माधवनचा 'रॉकेट्री' ओटीटीवर होणार रिलीज


R. Madhavan : कोल्हापूरचा जावई अन् राजाराम कॉलेजमधील धम्माल; आर. माधवनने उलघडली अनेक गुपितं