Ek Villain Returns : जॉन अब्राहम (John Abraham), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि दिशा पाटनी (Disha Patani) अशी तगडी स्टारकास्ट असणारा  'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns)  हा चित्रपट शुक्रवारी (29 जुलै) रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं सुरुवात केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
 
'एक व्हिलन रिटर्न्स'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 7.05 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 6.90-7.10 कोटी कमावले आहेत. या चित्रपटानं आत्तापर्यंत जवळपास 13.65 कोटींची कमाई केली आहे. आज (रविवार) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकतो. 


एक व्हिलन रिटर्न्स हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटातील सर्व स्टार्स खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. ग्रे कॅरेक्टर असणाऱ्या या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत नाहीये. पण चित्रपटांमधील गाण्यांना मात्र प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. किच्चा सुदीपच्या विक्रांत रोणा या चित्रपटासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' ची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. विक्रांत रोणा हा चित्रपट देखील सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 


2014 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग रिलीज झाला होता. या पहिल्या पार्टनं ओपनिंग डेला 16.50 कोटींची कमाई केली होती. रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर यांनी  'एक व्हिलन' या चित्रपटामध्ये काम केलं होतं. 


'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या मोहित सुरीचे ‘मलंग’ (2020) , ‘हाफ गर्लफ्रेंड’(2017), ‘हमारी अधूरी कहानी’(2015) हे तीन चित्रपट फ्लॉप ठरले. आता जर ‘एक विलेन रिटर्न्स’ या त्याच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. तर मोहित सुरीच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाच्या नावाचा समावेश होऊ शकतो, अशी चर्चा आहे. 


हेही वाचा: