The Kashmir Files Director Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'चे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सध्या चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्रींनी नुकताच ट्विवटरला रामराम केला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी ट्रोलिंगला कंटाळून ट्विटरला रामराम ठोकला आहे. आता विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरला अलविदा केल्याने सोशल मीडियावर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. 


विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर अॅक्टिव्ह होते. ट्विटरच्या माध्यमातून ते त्यांचे मत मांडत असत. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर डीअॅक्टिव्ह का केलं यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. विवेक अग्निहोत्रींने त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, काहीतरी कलात्मक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ट्विटर डीअॅक्टिव्ह करत आहे. लवकरच भेटू." 






विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरला रामराम केल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. विवेक अग्निहोत्रींनी नव्या सिनेमाच्या अभ्यासासाठी ट्विटर डीअॅक्टिव्ह केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विवेक अग्निहोत्रींच्या ट्वीटवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. 'पुढल्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा', 'याच दिवसाची वाट पाहत होते...शुभेच्छा'.'आता ट्विटर अॅक्टिव्ह न करणेच फायदेशीर ठरेल'. अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत. 


राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं नाव नसल्याने विवेक अग्निहोत्रींनी ट्वीट करत त्यांचं मत मांडलं होतं. ते म्हणाले होते,"राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यश मिळवल्याबद्दल सूरराई पोटरु, सूर्या, अपर्णा बालमुरली, सुधा कोंगारा आणि अजय देवगण यांचे खूप अभिनंदन. साऊथ सिनेमासाठी सध्या चांगले दिवस आहेत. त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीला अधिक मेहनत करण्याची गरज आहे".


संबंधित बातम्या


Vivek Agnihotri: राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चं नावही नाही! दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात...


Bollywood Industry: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा बॉलिवूडच्या खान मंडळींवर हल्लाबोल, ‘जोपर्यंत बॉलिवूडमध्ये बादशाह, सुलतान आहेत, तोपर्यंत...’