SS Rajamouli New Project Made in India Movie : एसएस राजामौली (SS Rajamouli) हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आहेत. 'बाहुबली' (Baahubali)  आणि 'आरआरआर' (RRR) या सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शकांनी आता त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. एस.एस राजामौली यांच्या आगामी सिनेमाचं नाव 'मेड इन इंडिया' (Made In India) असे असणार आहे.


'मेड इन इंडिया' हा सिनेमा एक बायोपिक आहे. एसएस राजामौलींच्या या बायोपिकची निर्मिती त्यांचा मुलगा कार्तिकेय आणि वरुण गुप्ता करता करत आहे. तर नितीन कक्कड (Nitin Kakkar) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. एसएस राजामौलींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 






'मेड इन इंडिया' या सिनेमाची झलक चाहत्यांसोबत शेअर करत एसएस राजामौली यांनी लिहिलं आहे,"मेड इन इंडिया' या सिनेमाच्या कथेने मला प्रभावित केलं आहे. हा बायोपिक बनवणं ही माझ्यासाठी कठीण गोष्ट आहे. 'फादर ऑफ इंडियन सिनेमा' यांच्यावर सिनेमा बनवणं ही माझ्यासाठी चॅलेजिंग गोष्ट आहे. आमची टीम या सिनेमासाठी सज्ज आहे. अभिमानाने आम्ही हा सिनेमा तुमच्या भेटीला आणू". 


'आरआरआर'ने पटकावला ऑस्कर


2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच एसएस राजामौली चर्चेत आहेत. त्यांचा 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा जगभर गाजला. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमातील 'नाटू-नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉन्ग या गॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. 


दादासाहेब फाळके यांच्याबद्दल जाणून घ्या...


दादासाहेब फाळके यांना 'फादर ऑफ इंडियन सिनेमा' असं म्हटलं जातं. 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' असं त्यांना म्हटलं जातं. दादासाहेब फाळके यांनी सिने-निर्मितीचे तंत्र भारतात आणून भारतीयांना चित्रपटाची ओळख करून दिली. पुढे 19 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 95 सिनेमांची आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आधारित 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या सिनेमाचीदेखील निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात दादासाहेब फाळके यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. 


संबंधित बातम्या


Mohammed Siraj:सिराजची वादळी खेळी पाहून अनुष्का अन् विकीही भारावले; राजामौली म्हणाले, 'आमचा टोळीचौकीचा मुलगा...'


SS Rajamouli : 'RRR 2' एसएस राजामौली दिग्दर्शित करणार? विजयेंद्र प्रसाद यांचा खुलासा