Mohammed Siraj:  मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) आशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या फायनलमधील वादळी खेळीचं सध्या अनेक जण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील सोशल मीडियवर पोस्ट शेअर करुन सिराजचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli), अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma ), अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन सिराजच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीचं कौतुक केलं.


एस.एस. राजामौली यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'सिराज मियाँ, आमचा टोळीचौकीचा मुलगा आशिया कप फायनलमध्ये सहा विकेट्स घेऊन शाइन झाला आहे.'






 


अभिनेता विकी कौशलनं देखील मोहम्मद सिराजचं कौतुक केलं आहे.




 अभिनेता महेश बाबूनं ट्वीट शेअर करुन संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.






अभिनेत्री अनुष्का शर्मानं देखील इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं,'क्या बात है मियाँ, मॅजिक'




अनुष्का बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda 'Xpress) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट झुलन गोस्वामींची बायोपिक असणार आहे.  अनुष्काला क्रिकेटरच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


सिराजची आग ओकणारी गोलंदाजी 


आशिया चषकाच्या फायनल सामन्यात मोहम्मद सिराज याने आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. सिराजच्या  गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मोहम्मद सिराज याने एकापाठोपाठ एक विकेट घेत आशिया चषकाच्या फायनल सामन्यात दमदार कामगिरी केली. 


आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर 10 गडी राखून विजय (India vs Sri Lanka) मिळवला. भारताच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची फलंदाज पत्त्यांसारखे कोसळले. श्रीलंकेचा पराभव करत भारताने पाच वर्षांनंतर आशिया कपवर नाव कोरलं.  सामन्यात भेदक मारा करुन सहा विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजला 'प्लेअर ऑफ द मॅच' (Player of The Match) पुरस्कार देण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या:


पदार्पणात खराब कामगिरी, सोशल मीडियावर ट्रोल, संघातून डच्चूची शक्यता... सिराज कसा झाला आघाडीचा गोलंदाज