Ram Charan And Junior NTR RRR Sequal : 'आरआरआर' (RRR) या सुपरहिट सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली असून आता या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. 'आरआरआर'च्या पुढील भागाची म्हणजेच 'आरआरआर 2'ची (RRR 2) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता या सिनेमाचं दिग्दर्शन एसएस राजामौली (SS Rajamouli) करणार नसल्याचं समोर आलं आहे. 


एस एस राजामौलीचे वडील आणि 'आरआरआर' या सिनेमाचे लेखक विजयेंद्र प्रसाद (Vijayendra Prasad) यांनी 'आरआरआर 2' संदर्भात मोठा खुलासा केला आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत विययेंद्र म्हणाले की,"राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या 'आरआरआर' या सिनेमाच्या सीक्वेलवर काम सुरू केलं आहे. हॉलिवूड सिनेमांप्रमाणे या सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. तसेच हॉलिवूडचे निर्माते या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा एसएस राजामौली किंवा आणखी कोणी दिग्दर्शत करू शकतो". 






एसएस राजामौली करणार महाभारत


विजयेंद्र प्रसाद पुढे म्हणाले की,"एसएस राजामौली 'एसएसएमबी 29' (SSMB 29) या सिनेमानंतर 'आरआरआर 2' (RRR 2) या सिनेमावर काम करायला सुरुवात करणार आहेत. 'एसएसएमबी 29' या सिनेमात महेश बाबू मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'आरआरआर'पेक्षा हा बिग बजेट सिनेमा असणार आहे. 'एसएसएमबी 29' या सिनेमानंतर एसएस राजामौली 'महाभारत' या ड्रीम प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहेत. 


सुपरहिट 'आरआरआर'


एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. देशासह विदेशातही हा सिनेमा गाजला. या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्करदेखील मिळाला आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर या सिनेमात मुख्य भूमिकेत असून दोघांनीही आपली भूमिका चोख बजावली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची (Alia Bhatt) झलक या सिनेमात पाहायला मिळाली. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशीच 100 कोटींचा टप्पा पार केला होता. 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने जगभरात 1200 कोटींची कमाई केली होती. आता 'आरआरआर 2' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Ram Charan - Upasana : लेकीला कुशीत घेऊन रुग्णालयातून बाहेर पडला राम चरण; उपासनासोबतचा फोटो व्हायरल