एक्स्प्लोर

Lok Sabha Elections 2024 : अमिताभ बच्चन यांनी राजकारण का सोडलं? स्वत:च सांगितलं कारण

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एकेकाळी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. पण राजकारणात त्यांना रुची वाटली नाही आणि तीन वर्षांनी त्यांनी राजकारणाला अलविदा केलं.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) सध्या सर्वत्र धामधूम आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं नुकतचं मतदान पार पडलं. आसाममध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं समोर आलं आहे. आसाममधील मतदानानंतर अमिताभ बच्चन यांचा एक किस्सा आता समोर आला आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राजकारणात एन्ट्री घेतली घेतल्यानंतर काही कारणांनी त्यांनी राजकारणाला अलविदा केलं. राजकारणात ते सक्रीय नव्हते. 

मित्रासाठी मैदानात उतरले अमिताभ बच्चन!

81 वर्षीय अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक असे म्हटले जाते. आजही एखाद्या तरुणाला लाजवलीत असं ते काम करतात. पाच दशकांच्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण एकेकाळी बिग बींच्या चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ कमी झाली होती. अमिताभ बच्चन चित्रपट सोडून राजकारणात सक्रीय झाले होते ही ती वेळ होती. खरंतर गांधी कुटुंबियांचे बच्चन कुटुंबासोबत जुने आणि चांगले संबंध होते. राजीव गांधी त्यांचा कौटुंबिक मित्र होता आणि मित्राला पाठिंबा देण्यासाठी ते मैदानात उतरले होते. 

बोफोर्समुळे राजकारण सोडलं...

8 व्या लोकसभा निवडणुकीच्या काळात अमिताभ बच्चन यांच्या पक्षाला 68% मत मिळाले होते आणि ते निवडणूक जिंकले होते. दरम्यान अमिताभ बच्चन यांचं नाव बोफोर्स प्रकरणात पुढे आलं होतं. त्यानंतर जुलै 1987 मध्ये त्यांनी राजकारणाला अलविदा केलं. अमिताभ बच्चन यांनी राजकारण सोडण्याचं हे एकच कारण नव्हतं. खरंतर आसाममध्ये एक घटना घडली होती. या घटनेने अमिताभ बच्चन यांना विचार करायला भाग पाडला आणि त्यांनी राजकारणाला रामराम केलं. अमिताभ बच्चन यांनी स्वत:चं आपल्या ब्लॉगमध्ये याचा खुलासा केला होता. 

अमिताभ बच्चन म्हणाले होते की, काँग्रेसच्या प्रचारादरम्यान एका चुकीच्या निर्णयामुळे हेलिकॉप्टरने मला चुकीच्या ठिकाणी उतरवलं होतं. दरम्यान एक मुलगा मला कागदाचा तुकडा देऊन गेला. यात लिहिलं होतं,"मिस्टर बच्चन मी तुमचा मोठा चाहता आहे. पण माझा पाठिंबा दुसऱ्या पक्षाला आहे. तुम्हीदेखील दुसऱ्या पक्षाचा विचार करा आणि हे राज्य सोडा". लहान मुलाचा हा विचार बिग बींना विचार करायला भाग पाडला आणि मी राजकारणाला रामराम केलं". 

अमिताभ बच्चन यांनी राजकारण सोडण्याबद्दल सिमी गरेवालच्या कार्यक्रमात भाष्य केलं होतं. अमिताभ बच्चन म्हणाले होते,"मी राजकारणी नाही आणि राजकारणात येण्याचा माझा निर्णय भावनात्मक होता. राजीव गांधी आणि आमच्या कुटुंबाचे चांगले संबंध होते. याच कारणाने मी मित्रासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. तीन वर्षांतच मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता". 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi : भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Chandrapur Tiger : वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 22 February 2025Special Report | Waah Ustad | Taufiq Qureshi | उस्ताद झाकीर हुसैन यांना तालवाद्यातून आदरांजली, तालाचा नाद, उपस्थितांची दादSpecial Report Massajog Suresh Dhas Visit | न्यायाची प्रतीक्षा, आरोपींची बडदास्तSpecial Report Modi-Sharad Pawar : 'गुरु-शिष्य' भेटले कुणाकुणाला खटकले? आधार, आदर आणि आदर्श

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi : भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Chandrapur Tiger : वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
Video : चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
Telangana SLBC Tunnel Accident : तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
तेलंगणामध्ये निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आत 3 मीटर भाग कोसळला; 6 ते 8 मजूर अडकल्याची भीती
Embed widget