Liger Song Aafat : सध्या लायगर (Liger) या आगामी चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या चित्रपटामधील 'आफत' (Aafat) हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्यातील विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 


आफत गाण्यावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया 
यूट्यूबवर आफत हे गाणं रिलीज धालं आहे. या गाण्याला कमेंट करुन नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी या गाण्यामधील विजय आणि अनन्याच्या रोमँटिक अंदाजाचं कौतुक केलं तर काहींनी या दोघांच्या डान्सला पसंती दिली. आफत हे गाणं लायगर चित्रपटातील तीसरं गाणं आहे. या चित्रपटातील ‘अकडी पकडी’ आणि  ‘वाट लगा देंगे’ हे गाणं आधी रिलीज झालं होतं.


विजय देवरकोंडा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण 
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा हा लायगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमधील विजयच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले होता. हा चित्रपट  25 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही  करण जोहरनं केली आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर'  या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. 


पाहा गाणं: 



लायगरचा पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या पोस्टरला अनेकांची पसंती मिळाली.  समंथा रुथ प्रभूपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींनी या पोस्टरचे कौतुक केले आहे. 


हेही वाचा: