Annu Kapoor : गेल्या 40 वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) हे सध्या त्यांच्या क्रॅश कोर्स (Crash Course) या वेब सीरिजचं प्रमोशन करत आहेत. बॉलिवूडमध्ये एवढे वर्ष काम करुनही कराव्या लागणाऱ्या संघर्षाबाबत एका मुलाखतीमध्ये अन्नू कपूर यांनी सांगितलं. ते मुलाखतीमध्ये म्हणाले की, मी सलमान खान (Salman Khan) किंवा शाहरुख खान (Shah Rukh Khan) नाही. मला कामसाठी आजही संघर्ष करावा लागतो.
बॉलिवूडबाबत काय म्हणाले अन्नू कपूर?
एका मुलाखतीमध्ये अन्नू कपूर म्हणाले, 'बॉलिवूडमध्ये मी सुरुवातीच्या काळात असे अनेक प्रोजेक्ट्स केले होते जे मला अजिबात आवडले नाहीत. पण पैशासाठी मला हे सगळं करावं लागलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैशांची गरज आहे. मी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान नाही. मी 40 वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे पण आजही मला कामासाठी संघर्ष करावा लागतो. मी फक्त पैशांसाठी काम करतो. चित्रपटानंतर आता मी ओटीटी आणि टिव्हीमध्ये देखील काम करत आहे. मोठ्या पडद्यावर काम केल्यानंतर इतर प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कलाकाराकडे वेगळ्यावेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. हे सगळं असूनही मी काम करत आहे. हिच एका अभिनेत्याची खास ओळख असते.'
अन्नू कपूर यांची क्रॅश कोर्स ही वेब सीरिज पाच ऑगस्ट रोजी रिलीज झाली आहे. या वेब सीरिजमध्ये अन्नू कपूर यांनी रतनलाल जिंदल ही भूमिका साकारली आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये अन्नू कपूर यांच्यासोबतच भानू उदय, उदित अरोरा आणि अनुष्का कौशिक हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात.
वाचा इतर बातम्या: