Vijay Deverakonda Ananya Panday Dance Number Video : 'लायगर' (Liger) सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' (Akdi Pakdi Song) हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) थिरकताना दिसत आहेत. 


गेल्या अनेक दिवसांपासून 'अकडी पकडी' हे गाणं चर्चेत आहे. या गाण्याचा फर्स्‍ट लूक, टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्यात देवरकोंडा आणि अनन्याचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. 


'लायगर' या सिनेमाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. लायगरमधील देवरकोंडाचा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये या सिनेमाची चांगली क्रेझ पाहायला मिळत आहे. 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



25 ऑगस्टला 'लायगर' होणार रिलीज


'लायगर' सिनेमासाठी विजयने कोट्यवधींचे मानधन घेतले आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक पुरी जगन्नाथ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. हा सिनेमा 25 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. पोस्टर आणि गाणं आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 


'लायगर'मध्ये दिग्गज कलाकारांचा समावेश


दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अनेक रोमांचक पैलू दिसणार आहेत. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवराकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. निर्मात्यांनी मुंबई, अमेरिका, लॉस वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.


संबंधित बातम्या


Liger New Poster : ‘लायगर’चे नवे पोस्टर आऊट; 25 ऑगस्टला सिनेमा होणार रिलीज


Liger : ‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड!