Liger Trailer Launch : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याला ‘लायगर’ (Liger) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. या ट्रेलरची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. गुरुवारी (21 जुलै) संध्याकाळी लायगर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला चित्रपटाच्या टीमसोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता उपस्थित राहणार आहे. 


लायगर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला अभिनेता विजय देवराकोंडा, अभिनेत्री अनन्या पांडे, दिग्दर्शक पुरी जन्ननाथ आणि चित्रपटाचा निर्माता  करण जोहर उपस्थित राहणार आहे. या ट्रेलर लाँचला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह देखील उपस्थित राहणार आहे. करण जोहरनं ट्रेलर लाँच इव्हेंटचा चीफ गेस्ट म्हणून रणवीरला आमंत्रित केलं आहे. 


'लायगर' हा चित्रपट 25 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी  'लायगर'  या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'अकडी पकडी' हे गाणं रिलीज झालं. 


‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड! 


समंथा रुथ प्रभूपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींनी या पोस्टरचे कौतुक केले आहे. या पोस्टरने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात जलद गतीने 1 दशलक्ष लाईक्स गाठणारे हे पहिले भारतीय चित्रपट पोस्टर बनले आहे. या पोस्टरने अवघ्या 4 तासांत हा विक्रम केला आहे. 25 ऑगस्ट 2022 पासून 'Liger'  हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहे.


हेही वाचा:


Akdi Pakdi Song : 'लायगर' सिनेमातील बहुचर्चित 'अकडी पकडी' गाणं रिलीज; विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा रोमॅंटिक अंदाज