Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांची 'ही' इच्छा अपूर्णच; अयोध्येच्या राम मंदिरात गुंजणार गानसम्राज्ञीचे स्वर
Lata Mangeshkar : अयोध्या येथील राम मंदिराच्या उद्धाटनादरम्यान दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे स्वर गुंजणार आहेत.
![Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांची 'ही' इच्छा अपूर्णच; अयोध्येच्या राम मंदिरात गुंजणार गानसम्राज्ञीचे स्वर Lata Mangeshkar recorded ram bhajan Shlok during her final days for ayodhya ram mandir inauguration Know Details Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांची 'ही' इच्छा अपूर्णच; अयोध्येच्या राम मंदिरात गुंजणार गानसम्राज्ञीचे स्वर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/2c5ca404cf87ae361fe4431ddb53d8de1696821980607254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lata Mangeshkar Recorded Ayodhya Ram Mandir Inauguration Songs : भारतरत्न आणि दिवंगत गायिका लता मंगेशकर (Lata Manheshkar) आज या जगात नसल्या तरी त्यांचा आवाज, त्यांची गाणी मात्र अजरामर आहेत. लता दिदींनी निधनाआधी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनासाठी काही भजने आणि श्लोक रेकॉर्ड केले होते.
राम मंदिराच्या उद्धाटनादरम्यान लता मंगेशकर यांचे स्वर गुंजणार आहेत. लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी, भजने आणि श्लोक उपस्थितांना ऐकायला मिळणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटनाला उपस्थित राहण्याची लता दिदींची इच्छा होती. पण त्यांची ही इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे. निधनाआधी त्यांनी तयारीदेखील सुरू केलेली. काही भजने आणि श्लोक रेकॉर्ड करुन ठेवले होते.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटन कार्यक्रमात सहभागी होण्याची लता दिदींची इच्छा अपूर्ण
लता मंगेशकर यांनी आजवर विविध भारतीय भाषांमधील अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेमांसह त्यांनी देशभक्तीपर गीते आणि भाव गीतंदेखील गायली. मंगेशकर कुटुंबियांच्या जवळ असणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार,जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धाटन कार्यक्रमात सहभागी होण्याची लता दिदींची इच्छा होती".
सुभाष के झा यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दिदींची प्रकृती खालावली होती. त्यांना उभंही राहता येत नव्हतं. तरीदेखील त्यांनी भजन रेकॉर्ड केलं. राम भजन हे लता दीदींचं शेवटचं भजन ठरलं. राम मंदिराच्या उद्धाटन कार्यक्रमाला काही निवडक राम भजनं आणि श्लोक, मंत्र लिहायचे आहेत असं म्हणत त्यांनी मयुरेश पै यांना फोन केला होता.
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी लता दीदींनी तयारी सुरू केली होती. शेवटपर्यंत त्या गात होत्या. काम त्यांचा आवाज राम मंदिरात ऐकायला यावा असं त्यांना वाटत होतं. त्यांची तब्येत बरी नसायची तरी त्यांना त्या सतत काही ना काही रेकॉर्डिंग करत राहाव्यात असं वाटायचं. लता दीदींना राम मंदिराच्या उद्घाटनासाठीदेखील जाण्याची इच्छा होती.
लता दीदींचं पहिलच गाणं सुपरहिट!
लता मंगेशकर यांनी 'आयेगा आने वाला' या सिनेमासाठी पहिल्यांदा गाणं गायलं. त्याचं पहिलच गाणं सुपरहिट ठरलं होतं. अनेक मोठ-मोठ्या संगीत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं आहे. जयदेवजी हे त्यांचे आवडते संगीत दिग्दर्शक होते. आरडी बर्मन, नौशाद साहेब आणि सज्जाद हुसैन यांच्यासोबत गाणं गायला त्यांना आवडायचे.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar : लता मंगेशकर पांढऱ्या रंगाची साडी का नेसायच्या? संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिदींना आवडायचे हिऱ्यांचे दागिने
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)