एक्स्प्लोर

...म्हणून लतादीदींनी लग्न केलं नाही!

गानकोकिळा अर्थात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 89 वा वाढदिवस. लतादीदींनी लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती.

मुंबई : भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित गानकोकिळा अर्थात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 89 वा वाढदिवस. लतादीदींनी लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती.  “ज्यावेळी मी 4-5 वर्षांची होते. तेव्हा किचनमध्य जेवण बनवत असणाऱ्या आईला स्टूलवर उभी राहून गाणं गाऊन दाखवतं असे. तोपर्यंत माझ्या या आवडीबद्दल वडिलांना माहितही नव्हतं”, असे लतादीदींनी एकदा ‘बीबीसी’च्या मुलाखतीत सांगितलं होतं. 20 भारतीय भाषा... 50 हजारहून अधिक गाणी... जवळपास सहा दशकं आपल्या आवाजाने 20 भारतीय भाषांमध्ये 50 हजारहून अधिक गाणी गाऊन ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये लतादीदींच्या नावाची नोंद झाली आहे. 89 वर्षीय लतादीदी आजही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. आजही त्यांनी गायलेल्या गाण्यांनी मनाला भुरळ पडते. लता मंगेशकर अशा व्यक्ती आहेत, ज्या हयात असताना त्यांच्या नावे पुरस्कार दिला जातो. 28 सप्टेंबर म्हणजे आज त्यांचा 89वा वाढदिवस आहे. ..आणि हेमाची लता झाली! लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये जन्मलेल्या लतादीदी या पंडीत दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या. लता मंगेशकर यांचं पहिलं नाव ‘हेमा’ होतं. मात्र, वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडिलांनी त्यांचं नाव ‘लता’ ठेवलं. लतादीदी त्यांच्या भावंडांमध्ये थोरल्या आहेत. मीना, आशा, उषा आणि सर्वात लहान ह्रदयनाथ मंगेशकर, असा लतादीदींच्या भावंडांचा गोतावळा आहे. लतादीदींचे वडील म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर हे नाट्यकलावंत आणि गायक होते. पहिली कमाई... पहिला ब्रेक... पहिलं हिट गाणं... लतादीदींना पहिल्यांदा स्टेजवर गाण्याचे 25 रुपये मिळाले होते आणि याच 25 रुपयांना आपली पहिली कमाई त्या मानतात. 1942 साली ‘किती हासाल’ या मराठी सिनेमातील गीत गाऊन त्यांनी सिनेक्षेत्रात पदार्पण केलं होतं. 1949 मध्ये महल सिनेमातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याच्या माध्यमातून त्यांची हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतर राज कपूर यांच्या ‘बरसात’मधील ‘जिया बेकरार है’, ‘हवा में उडता जाए’सारख्या गाण्यांमुळे लता मंगेशकर हे नाव हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी गायक-गायिकांच्या यादीत पहिल्या स्थानावर जाऊन पोहोचलं आणि ते आजतागायत पहिल्याच स्थानावर आहे. मान-सन्मान लता मंगेशकर यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या करिअरमध्ये एकूण चारवेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1972 साली ‘परिचय’, 1975 साली ‘कोरा कागज’ आणि 1990 साली ‘लेकिन’  या सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. याशिवाय, लता मंगेशकर यांना 1969 मध्ये पद्मभूषण, 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 1999 मध्ये पद्मविभूषण, 2001 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्नने त्यांचा सन्मान झाला. लतादीदी विवाहाच्या बंधनात का अडकल्या नाहीत? लहाणपणी कुंदनलाल सहगल यांच्या एका सिनेमात चंडीदास यांना पाहून लतादीदी म्हणत असत की, मोठ्या झाल्यावर चंडीदास यांच्याशी लग्न करेन. मात्र, लतादीदी अविवाहित राहिल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की, घरची जबाबदारी असल्यानं लग्न करण्याचा विचारही मनात आला नाही. लतादीदी चप्पल काढून स्टुडिओत जात असत... सुरेल आवाज आणि साध्या राहणीमुळे जगात ओळखल्या जाणाऱ्या लतादीदी आजही गाण्यच्या रेकॉर्डिंगवेळी स्वत:ची चप्पल काढून स्टुडिओत जातात. विष पाजून मारण्याचा प्रयत्न 1962 मध्ये जेव्हा लतादीदी 32 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांना स्लो पॉईजन देण्यात आलं होतं. लतादीदी यांच्या निकटवर्तीय पद्मा सचदेव यांनी ‘ऐसा कहाँ से लाऊं’ या पुस्तकात याबाबत सविस्तर लिहिलं आहे. त्यानंतर लेखक मजरुह सुल्तानपुरी अनेक दिवस लतादीदींच्या घरी जाऊन स्वत: जेवण चाखून मग लतादीदींना देत असत, असेही पद्मा सचदेव यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. मात्र, लतादीदींना मारण्याचा का प्रयत्न झाला, हे अद्याप उघड झालं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget