एक्स्प्लोर

ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन; लगान, चक दे इंडिया चित्रपटात साकारली होती भूमिका

लगान आणि चक दे इंडिया या चित्रपटांमधील जावेद (Javed Khan Amrohi) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Javed Khan Amrohi: अभिनेते जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जावेद खान अमरोही यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केलं. लगान (Lagaan) आणि चक दे इंडिया या चित्रपटांमुळे जावेद यांना विशेष लोकप्रिता मिळाली.  तसेच 'वन्स अपॉन अ टाइम' आणि 'अंदाज अपना-अपना' या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. 

मालिका आणि चित्रपटांमध्ये साकारली भूमिका

दोन वर्षापूर्वी रिलीज झालेल्या सडक-2 या चित्रपटामध्ये जावेद खान अमरोही यांनी काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी पाक्या ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेता आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. त्याच बरोबर जावेद खान अमरोही यांनी काही मालिकांमध्ये देखील काम केलं. ते इप्टाचे (इंडियन पीपल्स थिएटर्स असोसिएशन) सक्रिय सदस्य होते. फिर हेरा फेरी या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं होतं. तसेच मिर्झा गालिब,कुछ भी हो सक्ता है, नुक्कड या मालिकांमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. 1993 मध्ये रिलीज झालेल्या हम है राही प्यार के या चित्रपटामध्ये  त्यांनी काम केलं होतं. चक दे इंडिया या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेल्या सुखलाल या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं. जावेद खान अमरोही हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. 

अखिलेश मिश्रा यांनी शेअर केली पोस्ट

अभिनेते अखिलेश मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन जावेद खान अमरोही यांना श्रद्धांजली वाहिली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'जावेद खान साहेबांना श्रद्धांजली. महान अभिनेते, ज्येष्ठ कलाकार आणि इप्टाचे सक्रिय सदस्य' अखिलेश मिश्रा यांनी लगान या चित्रपटात जावेद खान अमरोही यांच्यासोबत काम केले.

जावेद यांना गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. गेल्या एक वर्षापासून ते अंथरुणाला खिळून होते. त्यांना सांताक्रूझ येथील सूर्य नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे दोन्ही फुफ्फुस निकामी झाले होते. ओशिवारा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 14 February : साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांची 'अधुरी प्रेम काहाणी'...

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget