Koffee With Karan 7 : करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण'  (Koffee With Karan 7) या चॅट शोचा सीझन 7 सध्या चर्चेत आहे. आता या शोचा नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या आठवड्याच्या भागात अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) करण जोहरच्या शोमध्ये दिसले. यादरम्यान, करण जोहरने अर्थातच या दोघांशी खूप गप्पा मारल्या. यावेळी अचानक शोचा होस्ट करणने कियाराशी तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलायला सुरुवात केली. करणने कियाराला तिच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) नात्याबद्दल प्रश्न विचारले. तर, करणच्या प्रश्नाला उत्तर देताना कियारानेही सांगितले की, ते दोघेही एकमेकांसाठी खूप खास आहेत.


'कॉफी विथ करण'मध्ये 'कबीर सिंह' फेम या जोडीने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. करण जोहरने शोमध्ये कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यातील नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. कियारा पहिल्यांदाच अशा प्रकारे सिद्धार्थसोबतच्या नात्यावर उघडपणे बोलली. मीडिया रिपोर्टनुसार, कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत, मात्र, दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलणे नेहमी टाळत असतात.



मैत्रीपेक्षा थोडं जास्तच!


यावेळी करणच्या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, मी सिद्धार्थसोबतचे माझे नाते कधीच नाकारत नाही. शेवटी करण जोहरने कियाराला विचारले की, तू आणि सिद्धार्थ जवळचे मित्र आहात का? यावर कियाराही म्हणते की, आम्ही क्लोज फ्रेंड्सपेक्षा थोडे जास्त आहोत. कियाराच्या या वक्तव्याने तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. कारण, आजपर्यंत कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या नात्याचा कधीही जाहीरपणे स्वीकार केलेला नाही.


कशी झाली पहिली भेट?


‘कॉफी विथ करण 7’मध्ये कियाराने स्वतःबद्दल आणि सिद्धार्थ मल्होत्राबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी तिने आपल्या नात्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकल्यानंतर शाहिद आणि करण दोघेही हसताना दिसले. कियाराने शोमध्ये सांगितले की, तिची आणि सिद्धार्थची पहिली भेट कशी झाली. कियारा म्हणाली की, शेरशाहमध्ये कास्ट होण्यापूर्वी मी आणि सिड एकमेकांना ओळखत होतो. करण आणि मी एका मित्राच्या घरी ‘लस्ट स्टोरीज’ची व्रॅपअप पार्टी करत होतो, या पार्टीत सिडही होता. त्या वेळी सिद्धार्थ आणि माझी पहिली भेट झाली.


कियारा आणि सिद्धार्थ यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. लवकरच, कियारा आणि सिद्धार्थ पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: