The Kashmir Files : काश्मिरी पंडितांच्या झालेल्या नरसंहाराचे वास्तव मोठ्या पडद्यावर दाखवणाऱ्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने जगभरात वाहवा मिळवली. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरील व्यवसाय देखील चांगला झाला होता. सगळ्याच स्तरांतून या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. मात्र, नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याने या चित्रपटाविषयी एक वक्तव्य केलं, ज्यामुळे चांगलाच गदारोळ माजला. अनुरागच्या या वक्तव्यावर आता ‘द काश्मीर फाइल्स’चे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, अनुराग कश्यपने यंदा ऑस्करच्या परदेशी श्रेणीमध्ये नामांकनासाठी भारताकडून पाठवल्या जाण्याऱ्या संभाव्य चित्रपटांच्या यादीविषयी काही वक्तव्ये केली, ज्यात त्याने ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल शंका निर्माण केली. यावर नाराज झालेले अभिनेते अनुपम खेर यांनी आता त्याला चांगलेच सुनावले आहे.


काय म्हणाले अनुपम खेर?


अनुरागने या मुलाखतीत म्हटले होते की, 'द काश्मीर फाइल्स' भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवली जाणार नाही, अशी शक्यता त्याला वाटते. आता अनुरागच्या या वक्तव्यावर अनुपम खेर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘अनुराग कश्यपने चित्रपटाबद्दल असे बोलायला नको होते. तो अगदी चुकीची गोष्ट बोलून गेला आहे.’ अनुपम खेर पुढे म्हणाले की, 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाला ऑस्कर मिळो वा ना मिळो, पण अनुराग कश्यपने या चित्रपटाबद्दल असे बोलायला नको होते. अनुरागने हा चित्रपट पाहिलाही नसेल. या चित्रपटाला ऑस्कर नामांकन मिळू शकणार की नाही, ही वेगळी बाब आहे. पण, अनुराग कश्यपने हे खूपच चुकीचे वक्तव्य केले आहे.


काय म्हणलेला अनुराग कश्यप?


अनुराग कश्यपने नुकत्याच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पाश्चात्य देश आणि हॉलिवूडमधील 'आरआरआर'च्या यशाबद्दल बोलताना म्हटले की, या चित्रपटाला ऑस्करसाठी टॉप 5 मध्ये नामांकन मिळण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान अनुराग म्हणाला की, 'द काश्मीर फाइल्स' भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठवली जाणार नाही, अशी शक्यता वाटत आहे.


बॉयकॉट ट्रेंड नाहीच!


अभिनेते अनुपम खेर यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बॉयकॉट ट्रेंडवरही चर्चा केली. ते म्हणाले की, लोक चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड फॉलो करतायत असे काही नाही. जे चित्रपट लोकांना पहावेसे वाटतात, ते चित्रपटगृहात जाऊन नक्कीच पाहिले जातात. यावेळी त्यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘भूलभुलैया 2’, ‘द काश्मीर फाइल्स’, 'आरआरआर', ‘पुष्पा’, ‘केजीएफ 2’ आणि ‘कार्तिकेय 2’ या चित्रपटांची उदाहरणे दिली.


संबंधित बातम्या


The Kashmir Files : सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी! जाणून घ्या कारण...


The Kashmir Files OTT Debut: ‘द कश्मीर फाइल्स’ आता घरबसल्या पाहता येणार! जाणून घ्या कधी आणि कुठे...