Sonam Kapoor on Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या  (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan) या कार्यक्रमाचा सातवा सिझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिझनच्या गेल्या आठवड्यातील एपिसोडमध्ये आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांनी हजेरी लावली होती. आता या सिझनच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor)  हे हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रोमोमध्ये अर्जुन आणि सोनम हे वेगवेगळे मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत. 


मलायकाबद्दल काय म्हणाला अर्जुन? 
प्रोमोमध्ये दिसत आहे की, अर्जुन कपूरला करण प्रश्न विचारतो की, मलायकाचा नंबर त्यानं काय नावानं सेव्ह केला आहे? या प्रश्नाचं उत्तर अर्जुननं दिलं, 'मला तिचं नाव आवडतं' 


ब्रह्मास्त्र ऐवजी सोनम म्हणते 'शिवा नंबर-1' 
डिज्नी प्लस हॉटस्टारच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, सोनमला करण हा प्रश्न विचारतो, 'तुझ्या मते, सध्या मॅन ऑफ द मुव्हमेंट कोण आहे?' या प्रश्नाला सोनम उत्तर देते, 'रणबीर सध्या बेस्ट आहे. कारण मी त्याला सगळीकडे बघत आहे. तो सध्या अयान मुखर्जीच्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. ' करण पुढे तिला विचारतो, 'त्या चित्रपटाचं नाव काय?' या प्रश्नाचं सोनम उत्तर देते, 'शिवा नंबर-1' ब्रह्मास्त्र ऐवजी सोनम अयानच्या चित्रपटाचं नाव  'शिवा नंबर-1' सांगते त्यामुळे करण आणि अर्जुन दोघेही हसतात. 


पाहा प्रोमो: 






कॉफी विथ करणमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतात. कॉफी विथ करणचा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी (11 ऑगस्ट) सकाळी 12 वाजता पाहू शकता. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि  रणवीर सिंह  यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 


वाचा इतर बातम्या: