Koffee With Karan Season 7करण जोहरचा (Karan Johar) चॅट शो 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) चा सातवा सिझन गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हे सेलिब्रिटी  या शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच करिअरबाबत चर्चा करतात. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हे हजेरी लावणार आहेत.  या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि विकी हे पंजाबी भाषेत बोलताना दिसत आहेत. 


कॉफी विथ करणच्या या एपिसोडमध्ये सिद्धार्थ आणि विकी हे करणसोबत मजेशीर गप्पा मारणार आहेत. या एपिसोडच्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे की, करण हा सिद्धार्थला त्याच्या आणि कियाराच्या लग्नाबाबत विचारतो. कियारासोबत लग्न करणार? या करणच्या प्रश्नाला सिद्धार्थनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. सिद्धार्थ म्हणतो, 'मी चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करतो.' त्यानंतर करण हा विकीला एक फोटो दाखवतो. हा फोटो विकीचा शर्टलेस लूकमधील असतो. त्यावर विकीच्या एका फॅननं या फोटोवर केलेली भन्नाट कमेंट करण वाचून दाखवतो. तसेच सिद्धार्थचा देखील एक फोटो करण दाखवतो. 


शेरशाह हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. त्यांच्या नात्याबाबत कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये सिद्धार्थ काय म्हणेल? याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 


पाहा प्रोमो: 



कॉफी विथ करणमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतात. कॉफी विथ करणचा आगामी एपिसोड तुम्ही गुरुवारी (16 ऑगस्ट) सकाळी 12 वाजता पाहू शकता. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.


वाचा इतर माहत्त्वाच्या बातम्या: