Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan  Box Office Collection Day 3: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)  'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट 21 एप्रिल रोजी  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची क्रेझ वाढत आहे.  चित्रपटानं ओपनिंग-डेला चांगली कमाई केली नाही पण वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. जाणून घेऊयात 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


फरहाद सामजीनं दिग्दर्शित केलेल्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच 21 एप्रिलला  15.81  कोटींची कमाई केली. 22 एप्रिलला 'किसी का भाई किसी की जान' पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती.  त्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्येही वाढ झाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी 25 कोटींचं कलेक्शन केलं.


सलमानच्या या चित्रपटाने  तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 26.25 कोटींची कमाई केली आहे. यासह 'किसी का भाई किसी की जान'चे एकूण कलेक्शन आता 67.06 कोटी झाले आहे. तीन दिवसात या चित्रपटानं  बॉक्स ऑफिसवर 50 कोटींच्या टप्पा पार केला आहे.


'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.


सलमाननं चाहत्यांचे मानले आभार


सलमानने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने  'किसी का भाई किसी की जान'  या चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार... तुमचं प्रेम आणि पाठिंब्याचं मला कौतुक वाटत आहे". 






'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबरोबरच सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kisi ka Bhai Kisi Ki Jaan Review : डोकं बाजूला ठेवून बघावा असा चित्रपट; वाचा 'किसी का भाई किसी की जान'चा रिव्ह्यू...