Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review : सिनेमांचे तीन प्रकार असतात. चांगला, वाईट आणि सलमानचा (Salman Khan) सिनेमा. 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा 'सलमानचा सिनेमा' या कॅटेगरीत मोडणारा चित्रपट आहे. भाईजानचा सिनेमा चांगला असो किंवा वाईट पण त्याचे सिनेमे चाहते पाहतातच. त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचं कथानक काय आहे? (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Story)
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमान खान एका सेल्फ डिफेन्स ट्रेनरच्या भूमिकेत दिसत आहे. भावांच्या सुखासाठी भांडणारा, त्यांच्या आनंदात स्वत:चा आनंद मानणारा असा हा 'भाईजान' आहे. वाद मिटवण्यासाठी तो अनेकदा हिसेंचादेखील वापर करतो. भाईजान लग्नाच्या विरोधात आहे. मुलगी आयुष्यात आल्याने तो त्याच्या भावांपासून दूर जाऊ शकतो असं त्याला कायम वाटत असतं. दरम्यान कथानक रंजक वळणावर येऊन पोहोचतं.
सलमानआधी त्याचे भाऊच प्रेमात पडतात. नंतर ते त्यांच्या लाडक्या भावासाठी मुलगी शोधू लागतात. दरम्यान भाईजानच्या आयुष्यात भाग्यलक्ष्मीची एन्ट्री होते. दाक्षिणात्य भाग्यलक्ष्मीसाठी भाईजान स्वत:मध्ये अनेक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो. अशातच 'राऊडी अण्णा'मुळे भाग्यलक्ष्मीचे कुटुंबीय अडचणीत आल्याचं त्याला कळतं आणि भाईजान त्यांच्या मदतीला धावतो.
'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा खूपच टिपिकल आहे. वर्षानुवर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सलमान याही सिनेमात अॅक्शन आणि रोमान्स करताना दिसणार आहे. अॅक्शनचा तडका असलेला हा सिनेमा एकंदरीतच मनोरंजनात्मक आहे.
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून सलमान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असून या सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमासाठी सलमानने विशेष मेहनत घेतली नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. हा सिनेमा चालेल ते फक्त सलमान खान या एका व्यक्तीमुळे.
पूजा हेगडेनेदेखील या सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. शहनाज गिल या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमान खान व्यतिरिक्त इतर सर्व कलाकार स्ट्रगलर आहेत. 'फेराफेरी 3' नंतर फरहाज सामजीने 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.