Manoj Bajpayee : हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्यांच्या यादीत मनोज वाजपेयीच्या (Manoj Bajpayee) नावाचा समावेश होतो. आज मनोज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. त्याने त्याच्या आगामी 'बंदा' या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


मनोज वाजपेयीने वाढदिवशी (Manoj Bajpayee Birthday) त्याच्या आगामी 'बंदा' (Bandaa) या सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाची घोषणा करत त्याने या सिनेमाचं पोस्टरदेखील शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये मनोजचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. 






मनोजने शेअर केलं 'बंदा'चं पोस्टर (Manoj Bajpayee Shared Bandaa Movie Poster)


मनोज वाजपेयीने सोशल मीडियावर 'बंदा' सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"न्यायाचा विचार केला तर बंदा पुरेसा आहे. सत्य घटनांनी प्रेरित असलेल्या गोष्टीचे साक्षीदार व्हा". 'बंदा' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, मनोज वाजपेयी या सिनेमात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. सत्यता आणि न्याय या गोष्टींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. याआधी मनोज वाजपेयीचे 'साइलेंस कैन यू हियर इट?' आणि 'डायल 100' या कलाकृती ओटीटीवर रिलीज झाल्या आहेत. 


मनोजचा 'गुलमोहर' (Gulmohar) हा सिनेमा याआधी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात तो शर्मिला टागोर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता मनोजचे चाहते त्याच्या 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


फॅमिली मॅनची स्टार कास्ट (Family Man Starcast Details)


'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वाजपेयी, शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.  तर दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूनं प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये कोणते कलाकार असणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


संबंधित बातम्या


The Family Man 3 : प्रतीक्षा संपली; 'द फॅमिली मॅन 3'च्या रिलीजबद्दल मनोज वाजपेयी म्हणाला...