Kiran Mane on Chhatrapati Shivaji Maharaj : आज राज्यभरात 'शिवजयंती' (Shiv Jayanti 2024) जल्लोषात साजरी केली जात आहे. सर्वसामान्य मंडळींसह अनेक सेलिब्रिटीदेखील शिवरायांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) आपलं मत मांडत आहेत. लोकप्रिय अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनीदेखील शिवजयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. 


किरण माने पोस्ट काय? (Kiran Mane Post)


किरण माने यांनी शिवजयंतीनिमित्त पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"आजकालचं काय घेऊन बसलाय.. अहो, तुकोबारांच्या काळातबी काही लोक एखाद्या सुमाराची भाटगिरी करताना, त्याची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अद्वितीय युगपुरुषाशी करायचे. मग तुकोबाराया अशांना सुनवायचे,"अरे मुर्खा.. कावळा कितीही गर्वानं फुगला तरी तो राजहंसापेक्षा ग्रेट होतो का?". 



किरण माने यांनी लिहिलं आहे,"फुगती काऊळे| म्हणे मी राजहंसा आगळे|| गजाहूनी खर| म्हणे चांगला मी फार|| मुलाम्याचे नाणे| तुका म्हणे नव्हे सोने|| कधी गाधव म्हणत मी हत्तीपेक्षा भारीय, पण, तुका म्हणतो सोन्याच्या पाण्याचा मुलामा दिलेलं नाणं, हे 'खरं सोनं' थोडीच असतं?". 


किरण माने यांनी पुढे लिहिलं आहे,"जसं संवेदनशील कवी आणि विद्रोहाचा जळजळीत अंगार याचं अफलातून कॉम्बीनेशन पहावं तर फक्त तुकोबारायामध्येच. तसचं, बहुजननांविषयी कळवळा असणारा, न्यायप्रिय, शेतकऱ्यांचा कैवारी, महिलांचा रक्षक, प्रचंड बुद्धीमान, शूर, मुत्सदी आणि स्वातंत्र्यासाठी 'जान हथेली पे' घेऊन शत्रूशी लढणारा राजा एक आणि एकच 'छत्रपती शिवराय' त्यांच्या पायाच्या धुळीचीबी बरोबरी करू शकेल असा एकही माईचा लाल पैदा झाला नाही आजपर्यंत. काजव्यानं जीव तोडून प्रकाशाची जाहीरात केली, तरी सूर्य हा शेवटी सूर्यच असतो गड्याहो. युवप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय". 


किरण मानेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव


किरण माने यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जाणता राजा, जय शिवराय, शिवजयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा, जय जिजाऊ जय शिवराय, राजे मानाचा मुजरा, अखंड हिदुंस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजे आम्हास तुम्ही हवे आहात, पुन्हा या, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


किरण माने नागपूरात साजरी करणार शिवजयंती


'शिवजयंती'निमित्त नागपूरात किरण माने यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 'बहुजन विचारमंचा'वरुन ते बोलणार आहेत.  नागपूरातील शिवशाही गड, पुरुषोत्तम बाजार, झिंगाबाई टाकळी येथे संध्याकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.


संबंधित बातम्या


Shiv Jayanti 2024 : 'छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू'; छगन भुजबळांचे प्रतिपादन