Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection Day 10: बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सॅनॉन (Kriti Sanon) ही जोडी सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण हे दोघेही मुख्य भूमिकेत असलेल्या 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya ) या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केलीये. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन स्टारर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवत आहे. हा रॉम-कॉम प्रेक्षकांना खूप आवडला आहे आणि यासोबतच चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात येत आहेत.
दुसऱ्या वीकेंडला 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला आणि त्याच्या कमाईत मोठी झेप घेतली. तेरी बातों मे ऐसा उलझा जिया या सिनेमाने रिलीजच्या 10 व्या दिवशी जगभरातील 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. असा हा बॉलीवूडमधील दुसरा सिनेमा आहे. यंदाच्या वर्षात बॉक्स ऑफीस गाजवणारा हा पहिलाच चित्रपट ठरण्याच्या मार्गावर सध्या आहे. रविवारी पुन्हा एकदा या चित्रपटाने जवळपास ओपनिंगची कमाई केली आहे.
10 व्या दिवशी सिनेमाचा कमाई किती?
या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शाहिद आणि क्रितीने एकत्र काम केलं आहे. तसेच यांच्या केमिस्ट्रीने देखील बॉक्स ऑफीसवर जादू केलीये. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 6.7 कोटींची कमाई केली. तसेच पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा 44.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकला. दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी चित्रपटाने 2.85 कोटी रुपये कमावले होते, तर शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत 75.44 वाढ दिसून आली आणि चित्रपटाने 5 कोटी रुपये कमावले. 10 व्या दिवशी या सिनेमाने सॅकनिल्कच्या च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने रविवारी 6.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वल्डवाईड 100 कोटींची कमाई
'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाने जगभरात देखील बक्कळ कमाई केलीय. या चित्रपटाला जगभरातून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे आणि यासोबतच चित्रपट जगभरातून प्रचंड कमाई करत आहे. मॅडॉक फिल्म्सने 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'जगभरातील कमाईची आकडेवारी शेअर केलीये. त्यानुसार, या सिनेमाने 9 दिवसांत जगभरात 98.06 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट 10 व्या दिवशी 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.