Chhagan Bhujbal नाशिक : अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापना करणारे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. मंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात शिवजन्मोत्सव सोहळा (Shiv Jayanti 2024) मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ व मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, रंजन ठाकरे,  विष्णुपंत म्हैसधूने, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, समाधान जेजुरकर, योगेश निसाळ, संजय खैरनार, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, कविता कर्डक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महात्मा फुलेंनी शिवरायांचा वारसा घराघरात पोहोचवला


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी १८८० साली रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली, त्या ठिकाणी साफसफाई करून मोठ्या आदराने त्या समाधीवर फुले वाहिली. तसेच शिवरायांवर पहिला पोवाडा लिहून शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. पुढे शिवजयंती साजरी करण्याची कल्पना देखील त्यांनीच मांडली आणि त्यासाठी वर्गणी देखील जमविली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या रयतेच्या या राजाचा त्यांनी 'कुळवाडीभूषण' असा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


नाशिकमध्ये शिवजयंतीचा उत्साह


नाशिक जिल्ह्यात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवस्वरुप वादन, आरती, शिवस्तुती, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने तरुणाई शिवजन्मोत्सवात सकाळपासूनच पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणाऱ्या ठिकाणी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. 


शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा


आज शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजन्मस्थळी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


आणखी वाचा 


Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त नाशिकच्या वाहतुकीत मोठे बदल, कुठले रस्ते बंद, कुठले सुरु? जाणून घ्या