Yodha Teaser : सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील काही काळापासून सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) 'योद्धा' चित्रपट (Yodha Movie) चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचा पोस्टर 13 हजार फूट उंचीवर दुबईत लाँच करण्यात आले होते. आता अॅक्शनपटाच्या सिक्वेन्ससह योद्धा चित्रपटाचा टीझर लाँच (Yodha Teaser) करण्यात आला आहे. 60 सेकंदाच्या या टीझरमध्ये अॅक्शनपटाची झलक दिसली आहे. 


योद्धाचा दमदार टीझर लाँच


सिद्धार्थ मल्होत्राने 'योद्धा'चा टीझर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 'आम्ही टेक ऑफ केला आहे... तुम्ही सर्वजण या हाय ऑक्टेन ड्रामाच्या ॲक्शनसाठी सज्ज व्हा...' अशी कॅप्शन सिद्धार्थने दिली आहे. टीझरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा हा एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसते. विमान अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना या दिसणार आहे. मिनिटभराच्या टीझरमध्ये या चित्रपटात अॅक्शनचा तडका असणार हे स्पष्ट आहे.


 






चित्रपटाची कथा काय असणार?


'योद्धा'चित्रपटाची एका लष्करी अधिकाऱ्यांच्या कामगिरी भोवती आहे. विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवाद्यांशी दोन हात करतो आणि प्रवाशांची सुखरूप सुटका करतो. 
सिद्धार्थ मल्होत्रा चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 


चित्रपट कधी प्रदर्शित होणार?


या चित्रपटापूर्वी सिद्धार्थने 'शेरशाह'मध्ये सैन्य अधिकाऱ्यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा सिद्धार्थ लष्करी जवानाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात दिशा पटानी पहिल्यांदाच सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांशिवाय राशी खन्ना देखील योधामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 15 मार्च रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.