Viral Video : किली पॉलचा मराठमोळा अंदाज, बहिणीसोबत थिरकला 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर; नेटकरी म्हणाले, 'भाऊ मराठी प्रेक्षकांना...'
किली आणि त्याची बहीण नीमा पॉल यांनी 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर डान्स केला आहे.
Viral Video : सध्या महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रील्स किली पॉल सोशल मीडियावर शेअर करतो. आता किली आणि त्याची बहीण नीमा पॉल हे 'बहरला हा मधुमास नवा' या मराठी गाण्यावर थिरकले आहेत. त्यांचा 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
किली आणि नीमा यांनी 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'या गाण्यावर डान्स केला, खूप एन्जोय केलं.' किली आणि नीमा यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओला लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.
व्हिडीओला नेटकऱ्यांच्या कमेंट्स
किली आणि नीमा यांच्या या व्हिडीओला एका एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'भाऊ मराठी प्रेक्षकांना खुश केल्याबद्दल तुला, प्रेमाचा जय महाराष्ट्र!' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मस्त डान्स केला नीमा ताई आणि किली भाऊ'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
सोशल मीडिया स्टार रिकी पाँडनं (Ricky Pond) देखील महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर डान्स केला. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात अंकुश चौथरीसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
बिजली बिजली, टिप टिप बरसा पानी आणि कूसू कूसू या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओ किलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 5 मिलियन नेटकरी किली पॉलला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. त्याच्या रिल्सला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. किलीची बहीण नीमा देखील सोशल मीडियावर विविध डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. नीमाला इन्स्टाग्रामवर 619K एवढे फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Ricky Pond: 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकला रिकी पाँड; नेटकरी म्हणाले, 'रिकी तात्या...'