Katrina-Vicky Wedding Guest: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) चे लग्न सध्या बी-टाऊनमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. विकी आणि कतरिना येत्या डिसेंबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या दोघांनी शाही विवाहसोहळा करण्याचा प्लॅन केला आहे. दरम्यान लग्नसोहळ्यात कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत त्यांची नावेदेखील समोर आली आहेत. 


लग्नसोहळ्यात हजेरी लावणार 'हे' सेलिब्रिटी


विकी आणि कतरिनाचा विवाहसोहळा दिमाखात पार पडणार आहे. बॉलिवूडचे अनेक नामांकित सेलिब्रिटी लग्नसोहळ्यात हजेरी लावणार आहेत. करण जौहर, कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, कबीर खान त्यांची पत्नी मिनी माथुर, रोहित शेट्टी, वरुण धवन त्याची पत्नी नताशा दलाल आणि अली अब्बास सारख्या बड्या कलाकारांचा या यादीत समावेश आहे. तसेच सलमान खानला लग्नाचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे सलमानदेखील लग्नाला उपस्थित राहू शकतो, अशी शक्यता आहे. 


विकी कौशल आणि कतरिना कैफने (Vicky Kaushal And Katrina Kaif) राजस्थानच्या पिंक सिटीमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे शाही लग्न करण्याचा प्लॅन केला आहे. 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. 700 वर्ष जुन्या असणाऱ्या एका किल्ल्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या किल्ल्यातला प्रति व्यक्ती एका रात्रीचा खर्च 90 हजार आहे. 


कतरिना-विकीचे नुकतेच प्रदर्शित झालेले सिनेमे


कतरिनाचा 'सूर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित झालेला आहे. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. कतरिना सोबत सिनेमात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंगदेखील दिसून आले आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच लोकप्रिय झाला होता. तर विकी नुकताच 'सरदार उधम' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'सरदार उधम' सिनेमातील विकीच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.


संबंधित बातम्या


Wedding Bells : कतरिना कैफने विकी कौशलला डिसेंबरमध्ये लग्न करण्यास शेवटी भाग पाडले! त्यामागचे कारण काय?


Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : कतरिना- विकीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! 'या' तारखेला कतरिना-विकी अडकणार विवाहबंधनात


प्रेक्षकांसाठी यंदाचा आठवडा ठरणार खास, OTT प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवाणी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha