ott platform new movies list: आठवडाभर काम केल्यानंतर विकेण्ड खास करण्यासाठी प्रेक्षक मनोरंजनाच्या शोधात असतात. या प्रेक्षकांसाठी यंदाचा विकेण्ड नक्कीच खास ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ओटीटीवर अनेक सिनेमे सज्ज आहेत. यातील काही सिनेमे रहस्यमय आहेत, तर काही सिनेमांमध्ये थ्रिलर आहे. त्यामुळे प्रेक्षकांना येत्या आठवड्यात भरपूर आनंद लुटता येणार आहे.
Special OPS 1.5: The Himmat Story-Disney+Hotstar: नीरज पांडेने दिग्दर्शित केलेली 'स्पेशल ऑप्स' ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. 'स्पेशल ऑप्स 1.5: द हिम्मत स्टोरी' हा नवा सीझन आता प्रदर्शित झाला आहे. या सिझनमध्ये हिम्मत सिंह हा रॉ एजंट कसा झाला हे दाखवण्यात येणार आहे. आफताब शिवदासानी, आदिल खान, गौतमी कपूर, परमीत सेठी आणि विजय विक्रम सिंग हे कलाकार या सीझनमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Home Sweet Home Alone: Disney+Hotstar: 10 वर्षांचा मॅक्सचे कुटुंब टोकियोला जाण्यासाठी निघते. पण मॅक्स मागे राहतो. त्यामुळे मॅक्सला स्वातंत्र्य मिळते. त्या स्वातंत्र्यामुळे मॅक्स आनंदित होतो. पण मॅक्सचा आनंद दीर्घकाळ राहत नाही. मॅक्सच्या घरात चोर घुसतात आणि सगळं धोकादायक होऊन बसते, असे या सिनेमाचे कथानक आहे.
Shang Chi And The Legend Of The Ten Rings: Disney+Hotstar: मार्वल स्टुडिओजचे चाहते शांग-ची आणि द लीजेंड ऑफ द टेन रिंग्सच्या सिमू लियूंना भेटतात. त्यामुळे शांग-चीलाला त्याच्या भूतकाळाचा सामना करावा लागतो.
DEXTER: New Blood- Voot Select: डेक्टरची (Dexter) तर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला खूप आनंद होईल. डेक्सटर त्याच्या नवीन जीवनाशी जुळवून घेणार आहे.
संबंधित बातम्या