Katrina Kaif Vicky Kaushal Wedding Date : बॉलिवूड कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात. कधी कलाकारांच्या अफेअरच्या तर कधी ब्रेक-अपच्या चर्चा सोशल मीडियावर होत असतात.  गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं जोडपं अभिनेता  विकी कौशल (vicky kaushal) आणि अभिनेत्री  कतरिना कैफ (Katrina Kaif) हे  विवाहबंधनात अडकणार आहेत अशा चर्चा आहेत. आता हे दोघे  लवकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  7, 8 आणि 9 डिसेंबर दरम्यान हा विवाह सोहळा राजस्थानमध्ये पार पडणार आहे. 


डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अडकणार विवाहबंधनात


मीडिया रिपोर्टसनुसार विक्की कौशल आणि कतरिना कैफने लग्नासाठी डिसेंबरचा महिना निवडला आहे. 7 ते 9 डिसेंबर पासून लग्नाच्या सोहळा असणार आहे. हा लग्नसोहळा साधसुधा नसून अत्यंत शाही पद्धतीने पार पडणार आहे. हा विवाह सोहळा 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात पार पडणार आहे. विवाहासाठी सवाई माधोपूर येथील एक रिसॉर्ट बुक करण्यात आला आहे. लग्नात कोण उपस्थित असणार याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.


लग्नाच्या अफवांवर Katrina Kaif ने सोडले मौन, म्हणाली...


सेलिब्रिटी डिझायनर सब्यसाची डिझाइन करणार लग्नपोशाख


दोघांचे लग्नाचे आउटफिट हे सेलिब्रिटी  डिझायनर सब्यसाची हे डिझाइन करणार आहेत. कतरिनाने लग्नासाछी रॉ सिल्कची निवड केली आहे. अद्याप विकी कौशलच्या ड्रेसविषयी काही माहिती समोर आलेली नाही. त्यांचा हा विवाह सोहळा गुपचूपपणे पार पडणार आहे. 


Vicky Kaushal Katrina Kaif Marriage : विकी-कतरिनाची लगीनघाई? 'हा' सेलिब्रिटी डिझायनर शिवणार लग्नपोशाख


 


कतरिना आणि विकीमधल्या प्रेमाची पहिली ठिणगी कॉफी विथ करणमध्ये पडली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठीच्या आणि फ्रेण्डशीपच्या चर्चा सुरु झाल्या. हळूहळू दोघांच्या आऊटिंगच्या बातम्याही समोर येऊ लागल्या आहेत. दोघे डेट करत असल्याच्या चर्चाही बॉलिवूडमध्ये बराच वेळ रंगत होत्या.  अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळणार असल्याचं कळतंय. अनुष्का-विराट, दीपिका-रणवीर पाठोपाठ विकी-कतरिनानंही नंबर लावल्याचं समजतंय आणि डिसेंबरमध्ये यांच्या लग्नाचा बार उडणार असल्याची माहिती जवळच्या सूत्रांकडून मिळत आहे.