Akshay Kumar 100cr Fims : बॉलिवूडमधील खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा चाहता वर्ग मोठा आहे. अक्षयच्या प्रत्येक चित्रपटाला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. अक्षयच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. फक्त सूर्यवंशी नाही तर अक्षयच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पाहूयात अक्षयचे असे चित्रपट ज्यांनी 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

  


मिशन मंगल (Mission Mangal) : 15 ऑगस्ट 2019 रोजी अक्षय कुमारचा मिशन मंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अक्षयच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 202 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटात अक्षयसोबत सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू आणि विद्या बालन या अभिनेत्रींनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.  


गुड न्यूज (Good News) :  2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या गुड न्यूज या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 205 कोटींपेक्षा जास्त झाले होते. या चित्रपटात करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि  कियारा आडवाणी या कलाकरांनी देखील काम केले होते. गुड न्यूज चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.   


हाउसफुल 4 (Housefull 4) : अक्षयचे कॉमेडी चित्रपट अनेकांना पाहायला आवडतात. त्याच्या हाउसफुल 4 या चित्रपटाने देखील प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. या चित्रपटाने 194 कोटींची कमाई केली होती.  


2.0: रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असणारा  '2.0' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने  189 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. 


गोल्ड (Gold): हॉकी खेळावर आधारित असलेल्या गोल्ड या अक्षयच्या चित्रपटाने 100 कोटी पेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. 


जॉली एलएलबी 2 (Jolly LLB 2) : जॉली एलएलबी 2 या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले होते. हा चित्रपट 2017 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे  बॉक्स ऑफिस कलेक्शन  117 कोटी  होते. 


एयरलिफ्ट (Airlift):  अक्षय कुमारच्या एयरलिफ्ट या चित्रपटाने 127 कोटींची कमाई केली होती.या चित्रपटात अभिनेत्री  निम्रत कौरने देखील काम केले होते. 


Govinda Naam Mera: 'गोविंदा नाम मेरा': विकी कौशलच्या नव्या चित्रपटाची चर्चा; भूमी आणि कियाराचा हटके लूक


रुस्तम (Rustom): अक्षयच्या रुस्तम या चित्रपटाने 127 कोटी कमवले होते. या चित्रपटातील अभिनेत्री एलियाना डीक्रूझ आणि अक्षयच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. 


Sushmita Sen Arya 2 first look : 'शेरनी इज बॅक'; सुष्मिता सेनने शेअर केला 'आर्या-2' चा फर्स्ट लूक