एक्स्प्लोर
'कट्टप्पा'च्या मुलीचं पंतप्रधान मोदींना पत्र
'बाहुबली' सिनेमात कटप्पाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सत्यराज यांच्या मुलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.
मुंबई : 'बाहुबली' सिनेमात कटप्पाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सत्यराज यांच्या मुलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. सत्यराज यांनी मुलगी दिव्याने या पत्रात काही वैद्यकीय कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिव्या स्वत: डॉक्टर आहे. काही यूएस फार्मा कंपन्या मला त्यांची औषधं रुग्णांना सूचवण्यासाठी दबाव टाकत होत्या. मात्र या औषधांमुळे रुग्णांच्या दृष्टीसह त्यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे ही औषधं सूचवण्यास दिव्याने नकार दिला.
मात्र दिव्या सत्यराजच्या नकारामुळे सदर कंपन्यांकडून तिला धमकीही देण्यात आली होती. पण धमक्यांना न घाबरता दिव्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून यासंबंधीची माहिती दिली.
दिव्याच्या पत्राची आता पंतप्रधान मोदी दखल घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, दिव्या लवकरच या प्रकरणी पोलिसातही तक्रार दाखल करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement