एक्स्प्लोर

Karwa Chauth 2022: ‘चाँद नजर आया...’; मनोरंजन विश्वातील ‘या’ अभिनेत्री साजरा करणार पहिला ‘करवा चौथ’!

Karwa Chauth 2022: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यंदा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा करणार आहेत.

Karwa Chauth 2022: आज म्हणजे 13 सप्टेंबर रोजी देशभरात ‘करवा चौथ’चा (Karwa Chauth 2022) सण साजरा केला जात आहे. या खास दिवशी सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि रात्री चंद्र पाहूनच उपवास सोडतात. करवा चौथची धामधूम बॉलिवूडमध्येही पाहायला मिळते. शिल्पा शेट्टीपासून अनुष्का शर्मापर्यंत अनेक अभिनेत्री आपल्या पतींसाठी हे व्रत करतात. या खास दिवशी सगळ्या अभिनेत्री सोशल मीडियावर सेलिब्रेशन फोटो देखील शेअर करतात. यंदा बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा माहोल होता. अनेक जोडप्यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यंदा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा करणार आहेत.

आलिया भट्ट (Alia bhatt)

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी या वर्षीच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री आलिया भट्टने यावर्षी 14 एप्रिल रोजी रणबीर कपूरसोबत लग्न केले. त्यामुळे यंदा त्यांचा पहिला करवा चौथ असणार आहे. त्यांचा हा पहिला करवा चौथ खूप खास असणार आहे, कारण आलिया लवकरच आई होणार आहे.

मौनी रॉय (Mouni Roy)

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय हिने देखील या वर्षी जानेवारीमध्ये तिचा बॉयफ्रेंड-बिझनेसमन सूरज नांबियारसोबत गोव्यात लग्नगाठ बांधली. यावेळी मौनी रॉयचाही पहिला करवा चौथ आहे, जो ती मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. सध्या मौनी बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे. नुकतीच ती ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकली होती.

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकी जैनसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अंकिता लोखंडे अनेकदा सोशल मीडियावर पारंपारिक अवतारात झळकली होती. अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करताना दिसत आहे. दरम्यान, यंदा अंकिताचा देखील पहिलाच करवा चौथ आहे. अभिनेत्री हा सण देखील मोठ्या थाटात साजरा करणार आहे.

करिश्मा तन्ना (Karishma Tanna)

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना देखील तिचा पहिला करवा चौथ साजरा करणार आहे. करिश्मा तन्ना हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतरचे सगळेच सण ती धुमधडाक्यात साजरे करत आहे. त्यामुळे लग्नानंतरचा हा पहिला करवा चौथ देखील ती जल्लोषात साजर करणार आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif)

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिचे नाव देखील चर्चेत आहे. 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिनाने विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. यंदा अभिनेत्री आपले पहिले करवा चौथ व्रत ठेवणार आहे. विकी एका पंजाबी कुटुंबातील आहे, जिथे हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे यंदा कौशल कुटुंबात आनंदाचा सोहळा साजरा होणार आहे.

हेही वाचा :

Karwa Chauth 2022: दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ते कभी खुशी कभी गम; 'या' चित्रपटात अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला 'करवा चौथ' सण

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget