Karthikeya 2 Trailer Launch : 'कार्तिकेय' (Karthikeya) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. 'कार्तिकेय' हा सिनेमा 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 


'कार्तिकेय 2'मध्ये निखिल सिद्धार्थ (Nikhil Siddharth), अनुपमा परमेश्वरन (Anupama Parmeswaran), आदित्य मेनन (Aditya Menon), अनुपम खेर (Anupam Kher) आणि हर्षा चेमुडू मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तेलुगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेत 12 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असून या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य अनुभवायला मिळणार आहे. 


द्वारका नगरीतील रहस्यांचा होणार उलगडा


'कार्तिकेय 2' या सिनेमाचे कथानक आणि दिग्दर्सन चंदू मोंडेती यांनी केलं आहे. तर या सिनेमाच्या प्रोडक्शनची धुरा विश्व प्रसाद आणि अभिषेक अग्रवालने सांभाळली आहे. कार्तिक घट्टामनेनीने कोरियोग्राफीची केली आहे. या सिनेमात द्वारका नगरीतील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यात आला आहे. 


'कार्तिकेय 2' या सिनेमासाठी खूप अभ्यास करण्यात आला आहे. पण हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करेल याचा ट्रेलरवरून अंदाज येतो. सिनेमाचे कथानक भावनिक आहे. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालणार आहे.



संबंधित बातम्या 


Karthikeya 2 : निखिल सिद्धार्थच्या 'कार्तिकेय 2'चा येणार सीक्वल; टीझर आऊट


KBC 14 : 50 लाखांच्या प्रश्नासाठी आमिर खानला घ्यावी लागली ‘लाईफलाईन’ची मदत! तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?