Actor Saanvika refused kissing scene : ज्याप्रमाणे पंचायत सीझन 4 मध्ये बिनोद (अशोक पाठक) आणि विधायक जी (पंकज झा) यांनी आपल्या प्रभावी अभिनयामुळे लक्ष वेधलं, तसंच सान्विका हिचीही चर्चा रंगली पण ऑनस्क्रीनपेक्षा ऑफस्क्रीन अधिक. सान्विका हिने साकारलेली गोड, शांत स्वभावाची पण ठाम रिंकी आणि सचिवजी (जितेंद्र कुमार) यांच्यात फुलणाऱ्या प्रेमाच्या नात्याने राजकीय कथानकात एक भावनिक टच दिला. मात्र, पडद्यामागे झालेल्या एका सर्जनशील निर्णयावर बरीच चर्चा झाली.

Just Too Filmy ला दिलेल्या मुलाखतीत सान्विकाने खुलासा केला की, तिने सहकलाकार जितेंद्र कुमारसोबत किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. तिच्या मते, हा निर्णय वैयक्तिक कम्फर्ट आणि शोच्या कौटुंबिक प्रेक्षकवर्गाचा विचार करून घेतला गेला.

ती म्हणाली, “सुरुवातीला कथानक सांगितल्यावर कोणी काही बोललं नाही. पण मग दिग्दर्शक अक्षत (विजयवर्गीय) यांनी मला बोलवलं. त्यांनी सांगितलं की, या सीझनमध्ये सचिवजी आणि रिंकी यांच्यात एक किसिंग सीन ठेवला आहे. पूर्वी सीन वेगळा होता कारमध्ये ते होते, ती खाली पडते आणि मग ते किस करतात.”

सान्विकाने पुढे सांगितलं, “मी विचार करण्यासाठी दोन दिवस मागितले. मला थोडी काळजी वाटत होती. पंचायत हा सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांसाठी असला तरी मुख्यतः कुटुंब एकत्र बसून तो पाहतात. आणि मी सुद्धा त्या सीनबाबत फारसे कम्फर्टेबल नव्हते. म्हणून मी त्यावेळी नकार दिला. नंतर जेव्हा आम्ही शूट करत होतो, तेव्हा तो सीन काढून टाकण्यात आला आणि त्याऐवजी वॉटर टँक सीन ठेवण्यात आला.”

‘मी शुभ मंगल ज्यादा सावधानमध्ये आयुष्मान खुरानाला किस केलं होतं’

सान्विकाच्या वक्तव्यावर पुढे स्पष्टीकरण देत जितेंद्र कुमारने NDTV ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “माझ्या मते, संविकाचं विधान चुकीच्या संदर्भात घेतलं गेलं. जेव्हा सीन सुचवला गेला, तेव्हा मी मेकर्सना सांगितलं की आधी तिची परवानगी घ्या. तिचं संमती देणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आम्हाला हा सीन थोडा गोंधळवाणा आणि मजेशीर दाखवायचा होता म्हणजे किस होणारच असतो तेवढ्यात लाईट जाते. पण शेवटी तो सीन वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आला.”

जितेंद्रने स्वतःच्या ऑनस्क्रीन इंटिमसीबद्दलच्या भूमिकेवरही भाष्य केलं. तो म्हणाला, “मी शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटात आयुष्मान खुरानाला किस केलं होतं. मी याआधीही स्क्रीनवर अभिनेत्रींसोबत किसिंग सीन केले आहेत. अभिनेता म्हणून मला त्यात काही अडचण नाही. पण किस असो किंवा काहीही सीन, त्याचा कथेशी संबंध असावा. कथा मजेशीर वाटली पाहिजे.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

तुमचा बायोपिक कोणी करावा? अवधूत गुप्तेंचा प्रश्न अन् अजितदादांचं आपसूक उत्तर..डॉ. निलेश साबळे