Karthikeya 2 Day 3 Box Office Collection : गेल्या काही दिवसांत अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' (Raksha Bandhan) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करत आहेत. कमी बजेट असलेल्या 'कार्तिकेय 2' (Karthikeya 2) या दाक्षिणात्य सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. 


तेलुगू अभिनेता निखिल सिद्धार्थचा 'कार्तिकेय 2' हा सिनेमा शनिवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. तर आमिर आणि अक्षयचे सिनेमे गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तरीही 'कार्तिकेय 2' या सिनेमाने बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. 


'कार्तिकेय 2' या सिनेमाने सोमवारी 15 ऑगस्टला 6.50 कोटींची कमाई केली आहे. तर 'कार्तिकेय 2' या सिनेमाने तीन दिवसांत 17.55 कोटींची कमाई केली आहे. 'कार्तिकेय 2' या सिनेमाची निर्मिती 15 ते 20 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. 'कार्तिकेय 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या सिनेमाचे शोज वाढवण्यात आले आहेत. 






'कार्तिकेय 2' या सिनेमात प्रेक्षकांना एक थरार नाट्य पाहायला मिळत आहे. 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'कार्तिकेय' सिनेमाचा हा सीक्वल आहे. या सिनेमात निखिल सिद्धार्थ (Nikhil Siddharth) आणि अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन (Anupama Parameshwaran) मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांसह अनुपम खेर (Anupam Kher), विवा हर्षा (Viva Harsha) आणि आदित्य (Adithya) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चंदू मोंदेती (Chandoo Mondeti) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


द्वारका नगरीतील अनेक रहस्यांचा होणार उलगडा


'कार्तिकेय 2' या सिनेमाचे कथानक आणि दिग्दर्सन चंदू मोंडेती यांनी केलं आहे. तर या सिनेमाच्या प्रोडक्शनची धुरा विश्व प्रसाद आणि अभिषेक अग्रवालने सांभाळली आहे. कार्तिक घट्टामनेनीने कोरियोग्राफीची केली आहे. या सिनेमात द्वारका नगरीतील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यात आला आहे.