Movie Release This Week : सिनेरसिक चांगल्या सिनेमांची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. येत्या शुक्रवारी अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात प्रेक्षकांना थरार, नाट्य, बायोपिक, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. तर अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. 


सिनेमाचे नाव : हिटः द फर्स्ट  (Hit The First) 
कधी होणार रिलीज : 15 जुलै
कुठे होणार रिलीज : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ


राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राचा 'हिटः द फर्स्ट' हा सिनेमा मागील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 15 ऑगस्टला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. हा एका तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रासह जतिन गोस्वामी, अखिल अय्यर, मिलिंद गुणाजी, शिल्पा शुक्ला, दिलीप ताहील आणि संजय नार्वेकर मुख्य भूमिकेत आहेत. 


सिनेमाचे नाव : शाबास मिथु (Shabaash Mithu)
कधी होणार रिलीज : 15 जुलै
कुठे होणार रिलीज : नेटफ्लिक्स


भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित 'शाबास मिथु' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा 15 जुलैला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मिताली राजच्या भूमिकेत आहे. 


सिनेमाचे नाव : द वॉरियर (The Warriorr)
कधी होणार रिलीज : 15 ऑगस्ट
कुठे होणार रिलीज : डिज्नी प्लस हॉटस्टार


एन. लिंगू स्वामी दिग्दर्शित 'द वॉरियर' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या सिनेमात राम पथोनेनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत. अॅक्शन, थ्रिलर असणारा हा सिनेमा 15 ऑगस्टला डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक पाहू शकतात. 


सिनेमाचे नाव : दोबारा (Dobaaraa)
कधी होणार रिलीज : 19 ऑगस्ट
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह


'दोबारा' हा सिनेमा 19 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. यात तापसीसह पावेल गुलाटी, राहुल भट्ट सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


सिनेमाचे नाव : दगडी चाळ 2 (Dagadi Chawl 2)
कधी होणार रिलीज : 18 ऑगस्ट
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह


'दगडी चाळ 2' हा सिनेमा 18 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चंद्रकांत कणसे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 


सिनेमाचे नाव : टकाटक 2 (Takatak 2)
कधी होणार रिलीज : 18 ऑगस्ट
कुठे होणार रिलीज : सिनेमागृह


'टकाटक' या मराठीतील बोल्ड सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे प्रेक्षक 'टकाटक 2'ची प्रतीक्षा करत होते. 'टकाटक 2' हा सिनेमा आता 18 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. हा विनोदी सिनेमा असून हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे. 


संबंधित बातम्या


Laal Singh Chaddha box office collection Day 5 : पाच दिवस लोटले, पण अद्याप पन्नास कोटींच्या क्लबपासून 'लाल सिंह चड्ढा' दूरच; एकूण कलेक्शन किती?


Raksha Bandhan Collection Box Office : अक्षयच्या 'रक्षा बंधन'ची जादू बॉक्स ऑफिसवर नाहीच; पाचव्या दिवशी कमावले 'एवढे' कोटी