Anurag Kashyyap Prediction For RRR : एसएस राजामौलींचा (SS Rajamauli) 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमाचे कथानक, भव्यता आणि वीएफएक्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी म्हटले आहे की, 'आरआरआर' सिनेमाचा ऑस्करच्या शर्यतीत समावेश होऊ शकतो. 


नुकत्याच एका मुलाखतीत अनुराग कश्यपने म्हटले आहे, 'आरआरआर' सिनेमाला ऑस्करचे नामांकन मिळू शकते. जगभरात हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमातील प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. हॉलिवूडच्या निर्मात्यांनादेखील हा सिनेमा आवडत आहे. स्कॉट डेरिकसन, जो अॅन्ड अॅंथनी रूसो, जेम्स गन अशा अनेक हॉलिवूडच्या निर्मात्यांनी या सिनेमाचे कौतुक केलं आहे. 


'आरआरआर' हा सिनेमा 24 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 277 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाने एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. तर अजय देवगन आणि श्रिया सरनची झलक या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. 






बिग बजेट सिनेमा


तेलुगु पीरियड ड्रामा 'RRR' ने या वर्षाच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात रिलीज झाला. 'आरआरआर' हा बिग बजेट सिनेमा आहे. एसएस राजामौली यांनी केवळ खर्चाची परतफेड केली नाही, तर प्रत्येक गुंतवणूकदार आणि भागीदाराने या सिनेमाच्या माध्यमातून पैसे कमावले आहेत. या सिनेमाने जगभरात तब्बल 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 1000 कोटींचा व्यवसाय करूनही 'आरआरआर'ची क्रेझ अद्याप थांबली नाही.


'आरआरआर' सिनेमाचा ऑस्करच्या शर्यतीत समावेश होणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. सिनेमागृहात या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. सिनेमातील अॅक्शनसह या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 


संबंधित बातम्या


RRR Hindi On Netflix : ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसाची प्रेक्षकांना खास भेट! नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार ‘RRR’