एक्स्प्लोर

चित्रपटाचं तिकीट 200 पेक्षा जास्त नाही, कर्नाटक सरकारचे आदेश

बंगळुरु : चित्रपटाच्या शोची वेळ, वार आणि थिएटरमधील सीटनुसार वेगवेगळे तिकीट दर प्रेक्षकांकडून आकारले जातात. तिकीटाचे दर हे सर्वसामान्यपणे शंभर रुपयांपासून एक हजाराच्या घरात पाहायला मिळतात. मात्र कर्नाटक सरकारने या प्रकाराला चाप लावत मल्टिप्लेक्समधील तिकीट दर दोनशे रुपयांवर रोखले आहेत. कर्नाटकातील थिएटर आणि मल्टिप्लेक्समधील चित्रपटांचे दर हे कर वगळता जास्तीत जास्त दोनशे रुपयांपर्यंत असतील, असं फर्मान कर्नाटक सरकारने काढलं आहे. कन्नड सांस्कृतिक आणि माहिती विभागाचे संयुक्त सचिव एस. एन. जयश्री यांनी काढलेल्या परिपत्रकात हा आदेश आहे. बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कानडी चित्रपटांचं तिकीट तीन रुपयांचा सर्व्हिस टॅक्स आणि शून्य मनोरंजन करासह (मनोरंजन करातून सूट दिल्यामुळे) 203 रुपयांपर्यंत असेल. तर कानडेतर (मुख्यत्वे बॉलिवूडपट) चित्रपटांचे तिकीट दर 60 रुपयांचा मनोरंजन कर आणि 4 रुपयांचा सेवाकर धरुन 264 रुपयांपर्यंत असतील. कानडेतर चित्रपटांना गोल्ड क्लास स्क्रीन आणि गोल्ड क्लास सीट्समध्ये सूट देण्यापासून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे कर्नाटकात गोल्ड क्लास स्क्रीनवर कानडी चित्रपट पाहताना 203 रुपयांचं तिकीट लागू होईल, मात्र हिंदी चित्रपट पाहण्यासाठी तिकीट दरावर कोणतंही बंधन नसेल. गोल्ड क्लास स्क्रीनवर कानडी वगळता इतर भाषेतील चित्रपट पाहण्यासाठी 500 ते एक हजार रुपयांपर्यंत तिकीट आकारलं जातं. तर कानडी चित्रपटांसाठी 350 ते 500 रुपयांचं तिकीट आहे. आयमॅक्स आणि 4D स्क्रीनवर चित्रपट पाहतानाही 200 रुपयांची मर्यादा नसेल. कर्नाटकमध्ये 40 मल्टिप्लेक्स, तर 600 सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत. त्यापैकी एकट्या बंगळुरुतच 30 मल्टिप्लेक्स आणि 60 थिएटर्सचा समावेश आहे. प्रत्येक थिएटरमध्ये सरासरी 600 सीट्स आहेत. मल्टिप्लेक्समधील स्क्रीन्सचा आकडा दोनपासून दहापर्यंत वेगवेगळा आहे. प्रत्येक स्क्रीनला साधारणतः 200 सीट्स असतात. सर्वसामान्यांना मल्टिप्लेक्समधील सेवांचा लाभ घेत परवडणाऱ्या दरात कन्नड किंवा इतर भाषिक चित्रपट पाहता यावेत, यासाठी दोनशे रुपयांवर तिकीट दर रोखण्यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव होता.

महत्त्वाच्या बातम्या

Chinmayee Sumeet Slam Kangana Ranaut On Gen Z Statement: 'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
'कंगना अत्यंत अभ्यासू, त्याशिवाय कधीच काही बोलत नाहीत...'; 'जेन-झीं'वर बरळणाऱ्या कंगना रनौतबाबत मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
Renuka Chowdhury On Kangana Ranaut: 'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
'भाजप महिलांसोबत प्रत्यक्षात काय करतं, हे तुला कळेल लवकरच...'; हिंदू तरुणींना वाट्टेल ते बोलणाऱ्या कंगना रनौतला काँग्रेसच्या खासदारानं झोड झोड झोडलं
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार
'स्वतःचा पक्षच हिला गांभीर्यानं घेत नाही...';'जेन झीं'ना 'जनरेशन गटार' म्हणणाऱ्या कंगनावर कॉकरोच जनता पार्टीचे तिखट वार

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Embed widget