एक्स्प्लोर
करीना-सैफच्या घरी नवा पाहुणा, बाळाचं नाव ठेवलं....
![करीना-सैफच्या घरी नवा पाहुणा, बाळाचं नाव ठेवलं.... Kareena Kapoor Delivers A Baby Boy In Breech Candy Hospital करीना-सैफच्या घरी नवा पाहुणा, बाळाचं नाव ठेवलं....](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/20050152/kareena-kapoor7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेत्री करीना कपूरच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. बाळ आणि आईची तब्येत सुखरुप आहे.
दरम्यान, तैमूर अली खान पतौडी असं सैफ आणि करीनाच्या बाळाचं नामकरण करण्यात आलं आहे. सैफ आणि करीनाच्या वतीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी बाळाच्या जन्माची आणि त्याच्या नावाची माहिती दिली.
'मी प्रेग्नंट आहे, मेली नाही', करीना भडकली
जुलै महिन्यात सैफने आपण पिता होणार असल्याची घोषणा केली होती. डिसेंबर महिन्यात करिनाला बाळ होणार असल्याची माहिती दिली होती. आज सकाळी 7.30 वाजता करीनाने मुलाना जन्म दिला. यावेळी पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर, बहिण करिश्मा कपूरसह दोन्ही कुटुंब उपस्थित होतं.सैफ अली खानची मुलगी आणि सुशीलकुमार शिंदेंचा नातू
दरम्यान, गरोदर असूनही करीना कपूरने कामातून ब्रेक घेतलेला नव्हता. ती अनेकदा शूटिंग करत होती. तसंच ती अनेक पार्टींमध्येही दिसत होती.
मुलगा की मुलगी, करीना-सैफने गर्भलिंग निदान चाचणी केली?
त्याआधी करिना आणि सैफने लपून छपून गर्भलिंग परीक्षण केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. त्यावर 'आम्हाला अद्यापही आमच्या होणाऱ्या बाळाचं लिंग माहित नाही,' असंही सैफने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.
करीना आणि सैफ लवकरच आई-बाबा बनणार?
दोन मुलांचा वडील असलेल्या सैफ आणि करीनाचं हे पहिलंच अपत्य आहे. सैफला अमृता सिंहपासून सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बीड
ठाणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)