Kareena Kapoor : अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीचा नुकताच अपघात झाला आहे. उपचारानंतर तिला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता तिला भेटण्यासाठी तिचे नातेवाईक आणि मित्र मैत्रीणी घरी येत आहेत. तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री करीना कपूरही मलायकाला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली आहे. परंतु, करीना मलायकाच्या घरून परत जात असताना तिच्याही कारचा छोटासा अपघात झाला आहे.
करीना कपूरच्या गाडीचा अपघात झाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये करीनाची कार पापाराजीच्या (फोटोग्राफर) पायावरून गेल्याचे दिसत आहे. यावेळी करीना चांगलीच भडकलेलीही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. करीनाच्या कारचा हा अपघात मलायकाच्या घरासमोर झाल्याची माहिती मिळत आहे.
मलायकाची भेट घेवून करीना बाहेर येत असताना तिचा चालक कार मागे घेत होता. यावेळी पापाराजींची कारभोवती एकच गर्दी झाली. पापाराजींनी करीनाच्या कारला चारी बाजूंनी घेरले असतानाच एका पापाराजीचा पाय कारखाली गेल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेकडे करीनाचे लक्ष जाताच ती जोर जोरात ओरडत कारकडे धाव घेते आणि चालकाला कार पाठीमागे घेण्याची सूचना देते. काही वेळानंतर ही गर्दी कमी होते आणि करीना तेथून निघून जाते.
मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर शनिवारी खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला होता. त्यामुळे तिच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. 3 एप्रिल रोजी तिला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
या अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला शनिवारी रात्रभर अंडर ऑब्जरवेशनमध्ये ठेवण्यात आले होते. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या