Ranbir-Alia Wedding : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या लग्नाच्या बातमीमुळे चर्तेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहेत. 17 एप्रिलला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. आलिया-रणबीर 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. 


आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 13 ते 17 एप्रिल दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आलिया-रणबीरच्या लग्नाला 450 मंडळी उपस्थित राहणार आहेत. 





आलियाच्या मेहेंदी आणि संगीतसाठी चाहते उत्सुक आहेत. आलियाच्या आजोबांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आलियाच्या आजोबांचा रणबीर लाडका आहे. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लग्न करावे, अशी आलियाच्या आजोबांची इच्छा आहे. रणबीर आणि आलिया 2021 मध्ये लग्नबंधनात अडकणार होते, पण कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.


संबंधित बातम्या


Salman Khan ला हायकोर्टाचा मोठा दिलासा, अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती


Alia Bhatt,Ranbir Kapoor : आलिया आणि रणबीरच्या लग्नाआधी खास बॅचलर पार्टीचं प्लॅनिंग; 'हे' सेलिब्रिटी होणार सहभागी


RRR Box Office Collection : आमिर खान अन् रजनीकांत यांच्या चित्रपटांना पछाडत आरआरआरची कोट्यवधींची कमाई; पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha