Saif Ali Khan and Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे बॉलीवूडचे राजेशाही जोडपे आहेत. लक्झरी लाइफस्टाईलमुळे हे कपल नेहमीच चर्चेत असते. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सैफ-करिनाच्या पाच सर्वात महागड्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
पतौडी पॅलेसचे मालक - पतौडी घराण्याचे नवाब सैफ अली खान यांना त्यांच्या वडिलोपार्जित घराचा वारसा लाभला आहे. रिपोर्ट्सनुसार, या पॅलेसची किंमत सुमारे 800 कोटी आहे.
सैफ-करीनाचे बंगले - ग्रँड रेसिडेन्सी हॉटेलजवळ सैफ करिनाचा बंगला एक आलिशान अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत सुमारे 4.2 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांचा स्वित्झर्लंडमध्ये एक बंगला आहे, ज्याची किंमत 33 कोटी आहे.
बॅग्सची शौकीन करीना - करिनाला बॅग आणि घड्याळांची शौकीन आहे. करीनाकडे Bvlgari Serpenti चे महागडे घड्याळ आहे. तसेच, करीनाकडे दोन बर्किन बॅग आहेत. ज्याची किंमत सुमारे 13 लाख रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे इतरही अनेक ब्रॅण्ड्सच्या बॅग्स आहेत.
सैफकडे गाड्यांचं कलेक्शन - सैफकडे बऱ्याच महागड्या गाड्या आहेत. रोझरोव्हरपासून मर्सिडीजपर्यंत अनेक महागड्या गाड्या सैफकडे आहेत.
करिना डायमंड आणि प्लॅटिनमची शौकीन - डायमंड आणि प्लॅटिनमचं उत्तम कलेक्शन करीनाकडे आहे. करीनाकडे सैफने दिलेल्या एंगेजमेंट रिंगच्या रूपात 5 कॅरेटचा प्लॅटिनम बँड आहे, ज्याची किंमत जवळपास 75 लाख रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tiger 3 teaser : कतरिना अन् सलमानच्या 'टायगर-3' चा धमाकेदार टीझर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
- Sushmita Sen : सुष्मिता सेनला 10 वर्ष कुणी कामच दिलं नाही? मोठ्या ब्रेकबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणते...
- Jhund : 'झुंड' चित्रपटासाठी बिग बींनी घेतलं कमी मानधन; म्हणाले, 'माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA