Karan Mehra : छोट्या पडद्यावरचा अभिनेता करण मेहराला 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली होती. करणने कोरोनाकाळात समाजसेवा केली होती. त्यामुळेच 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन'ने त्याला सन्मानित केले आहे.





करणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सन्मान झाल्याची माहिती दिली आहे. कृतज्ञता व्यक्त करत त्याने सन्मानपत्राचा फोटोदेखील शेअर केला आहे. फोटो शेअर करत करणने लिहिले आहे,"या सन्मानासाठी मी वर्ल्डबुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचे आभारी आभार व्यक्त करतो. कोरोनासारख्या साथीच्या रोगाविरुद्ध तो लढल्याने त्याला सन्मानित करण्यात आले आहे.





करणने शेअर केलेल्या फोटोवर चाहते कमेंट्स करत आहेत. 'करण तुझा अभिमान वाटतो', म्हणत चाहते आनंद व्यक्त करत आहेत. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनने सन्मानित केलेला करण हा दुसरा भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे. याआधी 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतील अभिनेता आसिफ शेखला सन्मानित करण्यात आले होते. आसिफने 300 हून अधिक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. 


संबंधित बातम्या


Sumona Chakravarti : अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला कोरोनाची लागण, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती


Prithviraj Movie Postponed : 'पृथ्वीराज' सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे


Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : नॅशनल क्रश रश्मिका करतेय विजय देवरकोंडाला डेट? सोशल मीडियावर चर्चांना उधाण


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha