Rashmika Mandanna-Vijay Deverakonda : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नुकताच तिचा 'पुष्पा- द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की रश्मिका प्रसिद्ध अभिनेता  विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत आहे. 


रश्मिकाची पोस्ट


रिपोर्टनुसार, न्यू ईयर सेलिब्रेशन करण्यासाठी रश्मिका आणि विजय हे गोव्याला गेले होते. यावेळी गोव्यामधील एका स्विमिंग पूलच्या जवळचा फोटो रश्मिकाने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. विजयचा भाऊ आनंद देवरकोंडा याने देखील त्याच स्विमिंग पूल जवळचा फोटो शेअर केला. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी रश्मिका ही विजयच्या कुटुंबासोबत गोव्याला गेली होते. त्यामुळे आता या दोघांच्या अफेअरबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे.   





'गीता गोविंदम' आणि  'डियर कॉमरेड' या चित्रपटांमधील विजय आणि रश्मिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लवकरच रश्मिका ही 'गुडबाय' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


संबंधित बातम्या


AR Rahman Daughter Engagement : ए.आर.रेहमानच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; कोण आहेत रेहमानचे जावई?


The Kapil Sharma Show : भारती, कृष्णा अन् अर्चना; कपिल शर्मा शोच्या कलाकारांचे मानधन माहितेय?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha